निमगावसावा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोनजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 20:20 IST2023-10-04T20:16:21+5:302023-10-04T20:20:01+5:30

येथील शिवमळा परिसरात दुचाकीवरून जात असताना बिबट्याने हल्ला करून दोघांना जखमी केले आहे....

Two people injured in a leopard attack in Nimgaonsawa | निमगावसावा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोनजण जखमी

निमगावसावा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोनजण जखमी

बेल्हा (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असतानाच मंगळवारी (दि. ३) सायंकाळी साडेसात वाजता निमगावसावा (ता. जुन्नर) येथील शिवमळा परिसरात दुचाकीवरून जात असताना बिबट्याने हल्ला करून दोघांना जखमी केले आहे.

याबाबत माहिती अशी की, पांडुरंग निवृत्ती गाडगे व नंदाराम पोपट मते हे दोघे दुचाकीवरून शिवमळा परिसरातून जात असताना शेजारील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांच्याही पायांना बिबट्याच्या हल्ल्याने जखमा झाल्या आहेत. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी नारायणगाव त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे.

Web Title: Two people injured in a leopard attack in Nimgaonsawa