बंडू बांदेकर टोळीतील आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:12 IST2021-03-05T04:12:44+5:302021-03-05T04:12:44+5:30

पुणे : विरोधी टोळीतील साथीदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गुंड बंडू आंदेकर याच्या टोळीतील आणखी दोघांना खडक पोलिसांनी ...

Two more members of Bandu Bandekar gang arrested | बंडू बांदेकर टोळीतील आणखी दोघांना अटक

बंडू बांदेकर टोळीतील आणखी दोघांना अटक

पुणे : विरोधी टोळीतील साथीदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गुंड बंडू आंदेकर याच्या टोळीतील आणखी दोघांना खडक पोलिसांनी अटक केली.

दानीश मुशीर शेख (वय २८, रा. नाना पेठ) आणि हितेंद्र विजय यादव (वय ३२, रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आंदेकर टोळीच्या वर्चस्वाला सूरज ठोंबरे व त्याच्या साथीदारांनी आव्हान दिले होते. आपले वर्चस्व कमी होऊ नये म्हणून बंडू आंदेकर याच्या इशा-यावरून त्यांच्या टोळीने ओंकार कुडले याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या गुन्ह्यात खडक पोलिसांनी बंडू आंदेकर व ऋषभ आंदेकर या दोघांना मंगळवारी रात्री ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Web Title: Two more members of Bandu Bandekar gang arrested