Pune: घरफोडी करुन दोन लाख तीस हजारांचा ऐवज चोरीला, मंचर शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 16:29 IST2024-05-30T16:28:53+5:302024-05-30T16:29:13+5:30
मंचर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे...

Pune: घरफोडी करुन दोन लाख तीस हजारांचा ऐवज चोरीला, मंचर शहरातील घटना
मंचर (पुणे) : शहरातील सदनिकेचा बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोंडून अज्ञात चोरट्याने दोन लाख तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मंचर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वनाथ सिताराम कारोटे यांनी फिर्याद दिली आहे. महालक्ष्मी अपार्टमेंट डोबीमळा मंचर येथे पहिल्या मजल्यावर कारोटे यांची सदनिका आहे. सदरची सदनिका बंद करून कारोटे बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्याने सदनीकेच्या दरवाज्याचा कडीकोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील ड्रॉवर उचकटवून आतील दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
यासंदर्भात विश्वनाथ कारोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमशेखर शेटे करत आहे.