एक्सप्रेस हायवेवर अपघातात मुंबईचे २ ठार, ३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 10:17 IST2018-12-03T10:07:04+5:302018-12-03T10:17:15+5:30

पिंपलोळी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.

Two killed, three injured on Mumbai pune express way accident | एक्सप्रेस हायवेवर अपघातात मुंबईचे २ ठार, ३ जखमी

एक्सप्रेस हायवेवर अपघातात मुंबईचे २ ठार, ३ जखमी

कामशेत :   मुंबईपुणे द्रुतगती मार्गावर पुणेमुंबई लेन वर थांबलेल्या डंपर गाडीला पाठीमागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात मुंबईच्या दोन जणांचा मृत्यू झाला तर ३ जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार ( दि ३ ) रोजी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पिंपलोळी गावाच्या हद्दीत पुणे मुंबई लेनवर किलोमीटर नं . ६९/४०० जवळ थांबलेला डंपर ( एम एच १६ ए वाय ८९६९ ) ला पाठीमागुन भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा टीयुव्ही ३०० ( एम एच ०४ जी डी ९७९१ ) ची चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती डंपरवर पाठीमागून धडकली. या अपघातात महिंद्रा गाडीतील जावेद इस्माईल शेख ( वय ४० रा.कुर्ला ) इस्माईल शेख ( वय ६५ रा. कुर्ला ) यांचा जागीच मृत्यु झाला असुन इतर तीन जण किरकोळ जखमी झाली असून त्यांची नावे अद्याप समजली नाही. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

तर अन्य एका अपघातात कामशेत बोगद्याजवळ कार दुभाजकाला धडकली. 

Web Title: Two killed, three injured on Mumbai pune express way accident