पुणे-पंढरपूर मार्गावर बस व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 11:49 IST2022-06-10T11:45:47+5:302022-06-10T11:49:25+5:30

एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात...

two killed in ST bus and two-wheeler accident at Pimpre on Pune-Pandharpur road | पुणे-पंढरपूर मार्गावर बस व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे-पंढरपूर मार्गावर बस व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

नीरा (पुणे) : नीरा (ता. पुरंदर) नजीक पिंपरे (खुर्द) येथे एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. गुरवार (दि.९ जून) रोजी रात्री १०:३० च्या सुमारास पिंपरे येथे पुणे-पंढरपूर मार्गावर मोटार सायकल आणि एसटी बस यांच्यात जोरदार टक्कर झाली. यामध्ये सुकलवाडी येथील विजय काळे व वाल्हे नजीक माळवाडी येथील नाना भुजबळ यांचा मृत्यू झाला आहे. 

पिंपरी चिंचवड ते गाणगापूर ही रातराणी बस (क्रमांक एम. एच. १४ बी. टी. ३४६६) गाणगापूरकडे निघाली होती. सुकलवाडीवाडी व माळवाडी येथे राहणारे दोघेजण मोटासायकल (क्रमांक एम. एच. १२ एच.एच. ३०७२) या मोटार सायकलवरून सुकलवाडीकडे निघाले होते.

पिंपरे येथील जया हॉटेल समोर आले असता एसटी आणि मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक झाली. यामध्ये मोटार सायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. घटनेनंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून दोघा मयातांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: two killed in ST bus and two-wheeler accident at Pimpre on Pune-Pandharpur road