two girls died by dawning in tank | दाेघी मैत्रिणी हातपाय धुण्यासाठी तलावात उतरल्या अन...

दाेघी मैत्रिणी हातपाय धुण्यासाठी तलावात उतरल्या अन...

लोणी भापकर  : शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन मैत्रिणींचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. लोणी भापकर (ता. बारामती) येथे शनिवारी (दि. १८) सायंकाळी ही  घटना घडली. या दोन्ही मुली येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता सहावीत शिकत होत्या. याबाबत रोहिदास विश्वास होळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात माहिती दिली. 

तन्वी रोहिदास होळकर (वय १३) व समीक्षा युवराज भोसले (वय १३) अशी या दोन मुलींची नावे आहेत. नेहमीप्रमाणे शाला सुटल्यानंतर घरच्या शेळ्या घेऊन तन्वी व समिक्षा शेतात गेल्या होत्या. शिंदे मळ्या जवळच्या होळकर वस्ती तलावानजीक त्या शेळ्या चरत होत्या. सायंकाळी घरी येताना हात-पाय धुण्यासाठी त्या तलावाच्या पाण्यात उतरल्या. मात्र, पाण्यात पाय घसरून पडल्याने त्या दोघी बुडल्या. यावेळी परिसरात कोणीही नसल्याने या मुलींचा आक्रोशही कोणास ऐकू आला नाही. तसेच सायंकाळी सातवाजेपर्यंत मुली घरी का आल्या नाहीत, म्हणून कुटूंबातील व्यक्तींनी त्यांचा शोध घेतला असता तलावाच्या शेजारी दोघींच्या चपला व झाडाला जेवनाचा डबा अडकवलेला दिसला. यानंतर तलावाच्या पाण्यामध्ये शोध घेतला असता. तन्वी व समिक्षाचा मृतदेह अढळून आला. अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आकस्मित मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: two girls died by dawning in tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.