शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक स्फोटात दोघांचा मृत्यू; २ गंभीर जखमी

By admin | Updated: September 19, 2016 20:49 IST

दौैंड तालुक्यातील कुरकुंभ परिसर सोमवारी पहाटे हादरला. येथील औद्योगिक वसाहतीमधील ईटरनीस या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि.१९ :  दौैंड तालुक्यातील कुरकुंभ परिसर सोमवारी पहाटे हादरला. येथील औद्योगिक वसाहतीमधील ईटरनीस या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. यात दोन कंत्राटी कामगार ठार झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींवर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रिजनंदन दास (वय ५०), बिनकुमार साहू (वय २०, दोघेही रा. बिहार, सध्या रा. मुकादमवाडी, कुरकुंभ, ता. दौंड) असे मृत कामगारांची नावे आहेत, तर विपुल करंजे व विक्रम व्हावळ जखमी झाले आहेत.सोमवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास हा स्फोट झाला. त्याची तीव्रता मोठी असल्याने कुरकुंभ गावापर्र्यंत हादरा बसला. काही ग्रामस्थ झोपेतून जागे होऊन भूकंप झाला, म्हणून घराबाहेर पडले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले होते.

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील ईटरनीस (पूर्वीची हिन्दुस्तान) रासायनिक उत्पादन करणारी एक कंपनी आहे. यामध्ये रासायनिक अभिक्रिया करताना मोठ्या प्रमाणात हायड्रोजन गॅसचा वापर केला जातो. सोमवारी (दि. १९) पहाटे ओटीबीपी (हायड्रोजेशन)प्लांटमध्ये स्टायरिन आॅक्साईड व हायड्रोजन या रासायनिक अभिक्रियेदरम्यान हा स्फोट झाला. स्फोटामुळे या कंपनीमधील वीजसेवा बंद झाल्याने मदतकार्य सुरू करण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. ज्यांना मदत देणे शक्य झाले त्यांना कंपनीच्या रुग्णवाहिकेतून खासगी दवाखान्यात पाठविण्यात आले. मात्र प्रत्यक्ष अपघाताच्या जागेवर असणाऱ्या कामगारांना जागेवरून हलताच आले नाही.

स्फोटाच्या तीव्रतेमुळे तीन मजल्यांचा हायड्रोजन प्लांट अक्षरश: कोसळला. त्यामुळे तेथील कामगार रिअ‍ॅक्टरखाली दबले गेले. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानदेखील झाले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, अतुल भोसले, राहुल सोनवणे यांनी भेट दिली. झालेल्या घटनेचा तपास सुरू आहे.सुरक्षिततेचे तीन-तेरा हायड्रोजनसारख्या गॅसचा स्फोट होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामधील अन्य कारखाने व लोकवस्तीला घातक परिणाम भोगावे लागू शकतात. याबाबत सुरक्षा यंत्रणेचा अभाव हा एक प्रकारे जीवघेणा खेळच कामगारांसोबत खेळला जात असल्याची परिस्थिती आहे.