ओतूरजवळ वीज घरावर पडून दोन बालकांचा करूण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 21:52 IST2019-06-10T21:48:31+5:302019-06-10T21:52:46+5:30

वीज घरावर पडल्याने घर कोसळले आणि घरात खेळत असलेली दोन चिमुकल्या मुलांचा घराखाली गाडून मृत्यू झाला.

two children's deaths in thunder fall down in near otur | ओतूरजवळ वीज घरावर पडून दोन बालकांचा करूण अंत

ओतूरजवळ वीज घरावर पडून दोन बालकांचा करूण अंत

ओतूर : वीज घरावर पडल्याने घर कोसळले आणि घरात खेळत असलेली दोन चिमुकल्या मुलांचा घराखाली गाडून मृत्यू झाला. त्यांची आजीही गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ओतूर परिसरातील तेलदरा येथे घडली.
 कार्तिक गोरख केदार ( वय २ वर्ष ), वैष्णवी विलास भुतांबरे ( वय ६ दोघेही रा. तेलदरा  ओतूर) असे ठार झालेल्या मुलांची नावे आहेत. तर चिमाबाई बापू केदार ( वय ६०) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  सोमवारी सायंकाळी ओतूर परिसराती मुसळधार पावसाला सुरवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरु झाला होता. सुमारे अर्धा तास पावसाचे हे रौद्र रुप सुरु असताना ओतूर परिसरातीर तेलदरा वस्ती येथील ठाकर समाजाच्या आदीवासी वस्तीतील एक कच्चे बांधकामाच्या घरावर वीज कोसळली. त्यामुळे घरा अक्षरक्ष: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. यावेळी घरामध्ये खेळत असलेले कार्तिक केदार अमि वैष्णवी भुतांबरे यांना दोन मुलांचा भिंतीखाली सापडून मृत्यू झाला तर शेजारीच बसलेल्या आजी चिमाबाई केदार या गंभीर जखमी झाल्या. जोरात झालेल्या आवाजाने वस्तीवर राहणारे ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तिघांनाही तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले त्यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सारोक्ते यांनी मुलांना मृत घोषित केले. तर आजी चिमाबाई यांच्या प्राथमिक उपचार करून त्यांना पुण्यातील रुग्णालायत पाठविण्यात आले.

Web Title: two children's deaths in thunder fall down in near otur