पूर्ववैमनस्यातून जाळल्या दोन मोटारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:31 IST2021-04-28T18:30:52+5:302021-04-28T18:31:27+5:30

जाळपोळ करणाऱ्या एकाला अटक

Two cars burned out of anticipation | पूर्ववैमनस्यातून जाळल्या दोन मोटारी

पूर्ववैमनस्यातून जाळल्या दोन मोटारी

ठळक मुद्देरस्त्यात मोटारीवर टाकला जवलनशील पदार्थ

पुणे: पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून दोन चारचाकी गाड्या जाळण्याचा प्रकार धानोरीमध्ये मंगळवारी पहाटे घडला. विश्रांतवाडी पोलिसांनी जाळपोळ करणाऱ्यास अटक केली आहे.
अशोक महादेव कांबळे (वय ५२, रा. भैरवनगर, धानोरी) असे अटक केलेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी रामचंद्र प्रभाकर चौरे (वय ४१, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. 

चौरे व कांबळे यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. या रागातून कांबळे यांनी गोकुळनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर चौरे यांनी लावलेल्या मोटारीवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळली. त्यांच्या शेजारी पार्क केलेली सोहेल पठाण यांची मोटार देखील या प्रकारात जळून गेली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा सर्व प्रकार कांबळे याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कांबळे याला अटक केली. पूर्वीच्या भांडणातून हा प्रकार केल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Two cars burned out of anticipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.