हडपसरमधील काळेपडळ येथे भुयारी मार्गात कोयत्याच्या धाकाने लुबाडणाऱ्या दोघांना केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 13:34 IST2021-06-24T13:33:00+5:302021-06-24T13:34:09+5:30
दोन मोबाईल, कोयता हस्तगत केला असून, वानवडी पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल

हडपसरमधील काळेपडळ येथे भुयारी मार्गात कोयत्याच्या धाकाने लुबाडणाऱ्या दोघांना केले जेरबंद
हडपसर: काळेपडळ रेल्वे क्रॉसिंगजवळील भुयारी मार्गामध्ये रिक्षा प्रवाशांना कोयत्याच्या धाकाने लुबाडणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून दोन मोबाईल, कोयता हस्तगत केला असून, वानवडी पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
शादाब युसूफ अन्सारी (वय १९, रा. सय्यदनगर, हडपसर) आणि फैयाज अन्सारी (रा. आदर्शनगर, उरुळी देवाची, ता. हवेली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ येथील रिक्षातील प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून वर्णन आणि संशय़ावरून आरोपीला पकडले. शादाब युसूफ अन्सारी आणि त्याचा साथीदार फैय्याज अन्सारी याच्याकडून दोन मोबाईल, कोयता असा एकूण तीस हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून, पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.