शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाचे केक तलवार, रेम्बो चाकूने कापणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:11 IST

पुणे : वाढदिवसाचा केक तलवारीने कापून तो फोटो व्हॉट्सॲपवर टाकणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने तलवारीसह पकडले. दत्तात्रय लक्ष्मण ...

पुणे : वाढदिवसाचा केक तलवारीने कापून तो फोटो व्हॉट्सॲपवर टाकणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने तलवारीसह पकडले.

दत्तात्रय लक्ष्मण धनकवडे (वय ४२, रा. दत्तप्रसाद अपार्टमेंट, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

रात्रीच्या वेळी चौकामध्ये गर्दी करून तलवार, रेम्बो चाकूने केक कापून गोंधळ घालतात. त्याचे फोटो व्हॉट्सॲपवर टाकून परिसरात दहशत निर्माण करतात. त्यांच्यावर आळा बसविण्यासाठी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी गुन्हे शाखेला दिले आहेत.

दत्तात्रय धनकवडे याने ९ एप्रिलला स्वत:च्या वाढदिवशी तलवारीने केक कापला आणि त्याचे फोटो व्हॉट्सॲपवर टाकले होते. पोलीस अंमलदार अमोल पवार यांना दत्तात्रय धनकवडे हा तलवारीसह घराच्या खालील चौकात उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन धनकवडे याला पकडले. त्याची झडती घेतली असता शर्टच्या आत लपवून ठेवलेली तलवार मिळून आली. सहकारनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टिपू ऊर्फ सलमान इम्तियाज शेख (वय ३०, रा. न्यू मंगळवार पेठ) याने २५ जुलै रोजी आपल्या वाढदिवशी रेम्बो चाकूने केक कापून ताे फोटो आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवला होता. पोलीस अंमलदार इ्म्रान शेख यांना टिपू हा साई हेरीटेज हॉटेलजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन पोलीस पथकाने टिपूला पकडून त्याच्याकडून रेम्बो चाकू जप्त केला आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.