किराणा मालाचे दुकान फोडून चोरले तब्बल अडीच लाखांचे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 16:57 IST2021-04-03T16:57:10+5:302021-04-03T16:57:42+5:30

नागरिकांध्ये पसरले घबराटीचे वातावरण

Two and a half lakh items were stolen from the grocery store | किराणा मालाचे दुकान फोडून चोरले तब्बल अडीच लाखांचे साहित्य

किराणा मालाचे दुकान फोडून चोरले तब्बल अडीच लाखांचे साहित्य

ठळक मुद्देअज्ञात चोरट्याविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बाभुळगाव: मौजे काटी येथील किराणा मालाच्या दुकानाचे शटर वाकवून रोख रक्कम आणि साहित्यासहित तब्बल एकूण २ लाख ४२ हजार,३५० रूपयांचे सामान चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १ एप्रिल रात्री ८ ते २ एप्रिल पहाटे ४:४० च्या दरम्यान घडली असून याबाबत अशोक जनार्धन भोसले (वय ३४),रा.काटी यांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

     आदित्य सुपर मार्केट व होलसेल किराणा मालाचे दुकानात १ एप्रिलला रात्री ८ वाजता भोसले यांनी दुकानाच्या गल्ल्यातील रक्कम मोजून ठेवली. त्यानंतर दुकान बंद करून रात्री ते घरी गेले होते. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला.  दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कमेसह किराणा आणि स्टेशनरी साहित्य चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेने काटी परीसरात खळबळ उडाली असून नागरिकांध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तर अज्ञात चोरट्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

Web Title: Two and a half lakh items were stolen from the grocery store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.