बारा वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन केला बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:25 IST2022-06-30T15:24:15+5:302022-06-30T15:25:01+5:30
पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या....

बारा वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन केला बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना
पिंपरी : ओळख निर्माण करून बारा वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. ही घटना २० मे २०२२ ते २० जून २०२२ या कालावधीत शुभम लॉज स्टेशन चौक, तळेगाव दाभाडे येथे घडली.
पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी मंगळवारी ( दि. २८ ) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी सौरभ छगन चव्हाण (वय २३, रा. तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे.
आरोपी सौरभ याचे नातेवाईक फिर्यादी यांच्या शेजारी राहत असल्याने आरोपीचे सारखे येणे-जाणे असायचे. यातून आरोपीने अल्पवयीन मुलीशी ओळख केली. त्यानंतर आरोपी फिर्यादी यांची परवानगी न घेता त्यांच्या मुलीस लॉजवर घेऊन गेला आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच मुलीला आणि फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली.