संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:06 IST2025-10-16T15:05:13+5:302025-10-16T15:06:29+5:30
ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेले सर्व शस्त्र भारतीय बनावटीचे होते, त्यात जवानांनी केलेली कामगिरी देखील कौतुकास्पद राहिली आहे

संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
पुणे: पूर्वी संरक्षण साहित्य बाहेरून घ्यावे लागत होते. डिफेन्स तंत्रज्ञान निर्मितीत आपण उतरलो आणि खूप मोठी झेप घेतली. डिफेन्स मधील उलाढाल दहा वर्षात ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर नेले आहे. २०२९ पर्यंत तीन लाख कोटी पर्यंत न्यायचे आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेले सर्व शस्त्र भारतीय बनावटीचे होते. त्यात जवानांनी केलेली कामगिरी देखील कौतुकास्पद राहिली आहे, असेही ते म्हणाले.
सिंबायोसिस स्कील ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या पदवीप्रदान समारंभ सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य मंत्री मंगलप्रसाद लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, लेफटनंट जनरल धीरज शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्र कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी प्रास्ताविक केले. यात सिंबायोसिस विद्यापीठ देशात पहिला क्रमांक पटकावल्याचे सांगून संस्थेच्या योगदानाची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. स्वाती मुजुमदार यांनी केले.
राजनाथ सिंह म्हणाले की, देशाची सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्र आहे. शिक्षण आणि राष्ट्रवाद याचे केंद्र महाराष्ट्र राहिले आहे. येथे मला येता आले याबद्दल आनंद वाटतो. पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष कामी येत नाही तोपर्यंत ते अपूर्ण आहे. हे विचारात घेऊन कौशल्यपूर्ण आणि निर्मितीक्षम तरुण घडवणे आवश्यक आहे. तसे झाल्यास जगात आपल्याला कोणी रोखू शकणार नाही. याच दृष्टीने स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले गेले. तब्बल २२ लाख लोकांना मॉडर्न स्कील आणि साहित्य पुरविले आहे. देशाला घडवणारी शक्ती म्हणजे स्कील आहे आणि ज्याच्याकडे स्कील आहे ती व्यक्ती नवीन काही निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ती डिस्ट्रॉय करत नाही. निर्मिती हीच मनुष्याची खरी ओळख आहे. सक्सेस दाखवण्यासाठी जगू नका, खरे स्वप्न पहा आणि सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करा. गांधी, सावरकर, नेताजी बोस यांनी आपले स्वप्न सत्यात आणले.