The tunnel work of underground mutha river start coming soon in pune | पुण्यात मुठा नदीखालील बोगद्याच्या कामाला लवकरच सुरुवात

पुण्यात मुठा नदीखालील बोगद्याच्या कामाला लवकरच सुरुवात

ठळक मुद्देकृषी महाविद्यालयापासून भुयारी मार्गाच्या दोन बोगद्यांचे काम सुरूदोन्ही बोगदे नदीपात्र ओलांडून पुढे जाणार

राजू इनामदार- 
पुणे : पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे काम आता शिवाजीनगरपर्यंत आले आहे. दिवाणी न्यायालयाच्या पुढे हा भुयारी मार्ग मुठा नदी ओलांडून पुढे मंडई व स्वारगेट असा आहे. खालून बोगदा व वरून नदी असे हे काम पुण्यात प्रथमच होत आहे. पावसाळ्याआधी या कामाला सुरुवात करण्याचा मेट्रोचा प्रयत्न आहे.
नदीचा तळ व बोगद्याचे छत यात साधारण २० फुटांचे म्हणजे ७ मीटर इतके अंतर असेल. भुयारी मार्ग या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे जवळपास ३० फुटांपेक्षा जास्त खोलीवर 
असणार आहे. नदीच्या अलीकेडच मेट्रोचे सिव्हिल कोर्ट हे भुयारी मार्गातील दुसरे स्थानक असेल. भुयारी मार्गातील अन्य ४ स्थानकांपेक्षा हे स्थानकही सर्वाधिक खोलीवर असेल. सिव्हिल कोर्ट भागातच मेट्रोचे प्रवासी स्थानकातून वर रस्त्यावर येतील.
कृषी महाविद्यालयापासून भुयारी मार्गाच्या दोन बोगद्यांचे काम सुरू झाले आहे. त्यातील एक बोगदा ६०० मीटर पुढे खोदून झाला आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम विलंबाने सुरू झाले. मात्र, तेही आता ३०० मीटरच्या पुढे गेले आहे. हे दोन्ही बोगदे समांतर असून प्रत्येक स्थानकामध्ये ते आतील बाजूने एकत्र होतील. मध्यभागी स्थानक व दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या व येणाऱ्या मेट्रोचे बोगदे अशी ही रचना आहे. खोदकाम होतानाच त्याला सिमेंटचे गोलाकार अस्तर होते.
तिथे काम काही काळ थांबवण्यात आले असल्याची माहिती मेट्रोचे संचालक (वर्क) अतुल गाडगीळ यांनी दिली. नदीपात्राचे सर्वेक्षण करून त्याचा सर्वाधिक खोलवर असलेला भाग निश्चित करण्यात आला आहे. त्याच्या किमान २० फूट खालून बोगद्याचे काम सुरू होईल. 
खोदकाम सुरू असताना पात्राच्या खालील बाजूने पाणी एकदम यंत्रात येऊ नये यासाठी त्याला कटरच्या समोरच्या बाजूला फोम प्रक्रिया केली जाते. त्यामुळे पाणी थेट यंत्रात न येता नियंत्रित राहते.
................
दोन्ही बोगदे नदीपात्र ओलांडून पुढे जातील. पुण्यात जमिनीखाली खोलवर सर्वत्र कातळ लागल्याने कामात फारसे अडथळे येत नाहीत. कातळामुळे नदीपात्राला खोदकामाचा धोका होणार नाही. 
......
६०० मीटर खोदकाम झालेल्या बोगद्यातील टीबीएम (टनेल बोअरिंग मशीन) तसेच पुढे थेट स्वारगेटपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे आता या मार्गासाठी चारऐवजी तीनच टीबीएम वापरण्यात येतील. बोगदा खणणारे टीबीएम मंडईतून जमिनीवर घेण्यासाठी जागा कमी पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The tunnel work of underground mutha river start coming soon in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.