शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सुशांत सिंग प्रकरणात अनेक सत्य दडपली जाताहेत,लवकरच सर्व सत्य बाहेर येईल : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 11:38 IST

पार्थ पवार यांच्या 'सत्यमेव जयते' या ट्विटमागे 'हे 'असे असू शकते कारण..

ठळक मुद्देलोकसभेची उमेदवारी देताना पार्थ पवार यांची किंमत कळली नव्हती का.? शरद पवारांना टोला

पुणे : राजकीय जीवनात प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार तर पवार कुटुंबियांचेच आहे. तसेच ते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते. त्यावेळी पार्थ पवार यांची किंमत कळली नव्हती का ? की त्यांना अशीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती असा प्रश्न उपस्थित करत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी शरद पवारांना जोरदार टोला लगावला. तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अनेक सत्य दडपली जात आहेत. ती सर्व सत्य लवकरच बाहेर येतील असेेही तेे म्हणाले.

तसेच पार्थ पवार यांना देखील सुशांत प्रकरणात काहीतरी मोठे सत्य दडपले जात असल्याचे वाटलं असेल. त्यामुळेच 'ते ' सत्य आपण बाहेर काढावे म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले असेेल, अशा शब्दात बापट यांनी पार्थ यांच्या ट्विट वर देखील रोखठोक भाष्य केले. 

 

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या जम्बो हॉस्पिटलच्या कामाची पाहणी केली.तसेच संथ गतीने सुरू असलेले जम्बो कोविड हॉस्पिटलच्या कामाबाबत त्यांनी पीएमआरडीए चे आयुक्त सुहास दिवसे यांना निवेदन सादर करून नाराजी व्यक्त करत, वेळेत काम न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

बापट म्हणाले,राजकीय जीवनात मी कोणावरही टीका करत नाही. आपण राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नये. जेणेकरून त्यातून काही प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे त्याला किंमत किती हे सर्वांना अगोदरपासून माहिती आहे. कोणाच्या मागे कोण उभा आहे ,हे थोड्या दिवसांत कळेल, ते ही बाहेर येईल.तसेच सुुशांत प्रकरणात अनेक सत्य दडपली जात आहेत. ती सर्व सत्य लवकरच बाहेर येेणार आहे.

पार्थ पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत बापट म्हणाले,भाजपाची विचारसरणी वेगळी आहे. ती विचारसरणी पार्थ यांना पटते का हे त्यांनाच विचारले पाहिजे. मात्र, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात भाजपची मंडळी हुशार आहे, आणि योग्य तो निर्णय ते घेतील असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.........काय आहे नेमके पार्थ पवार प्रकरण..  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देत केलेली 'सीबीआय चौकशीची मागणी' असो किंवा 'जय श्री राम' म्हणत राम मंदिराच्या उभारणीला दिलेल्या शुभेच्छा दिल्याने ते राजकीय चर्चेत आले होते. मात्र राष्ट्रवादीच्या विसंगत भूमिका घेतल्याने त्यांचे आजोबा व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पार्थ पवार यांना सार्वजनिकरित्या फटकारले होते. त्यानंतर पवार कुटुंबात नवा वाद उद्भवला होता. मात्र, बारामतीत अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या त्यानंतर स्नेह भोजनानंतर पवार कुटुंबातल्या या वादावर वादावर पडदा पडला होता. पण बुधवारी ( दि. १९) सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा  तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय दिला.त्यानंतर पुन्हा एकदा पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देत 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCBIगुन्हा अन्वेषण विभागgirish bapatगिरीष बापटSharad Pawarशरद पवारparth pawarपार्थ पवारBJPभाजपाState Governmentराज्य सरकार