प्रात्यक्षिकासाठी रबरी लिंग दिलं असेल तर काय चुकलं?- तृप्ती देसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:15 AM2022-03-21T11:15:10+5:302022-03-21T11:25:13+5:30

आशा वर्कर्स पुढे व्हा आणि कुटुंबनियोजनाच्या कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला...

trupti desai said whats wrong with giving rubber sex organ for demonstration | प्रात्यक्षिकासाठी रबरी लिंग दिलं असेल तर काय चुकलं?- तृप्ती देसाई

प्रात्यक्षिकासाठी रबरी लिंग दिलं असेल तर काय चुकलं?- तृप्ती देसाई

googlenewsNext

पुणे: सार्वजनिक आरोग्य विभागाने कुटुंब नियोजन किटमध्ये ग्रामीण भागांमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी जर रबरी लिंग दिले असेल तर चुकीचे काहीच नाही, आशा वर्कर्सनेसुद्धा संकुचित विचार बाजूला ठेवून कुटुंबनियोजन करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये  पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवण्याची आता गरज निर्माण झाली आहे, असं मत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (trupti desai) यांनी मांडले. 

पुढे बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, आम्ही हे कसे दाखवू , ग्रामीण भागातील महिला काय म्हणतील, असा जर आपण संकुचित विचार आता एकविसाव्या शतकात करत बसलो तर कुटुंबनियोजनाच्या गप्पा हवेतच राहतील. कुटुंब नियोजनाच्या या किटचे भूमाता ब्रिगेडच्या वतीने आम्ही स्वागतच करतो असंही देसाई यावेळी म्हणाल्या. आशा वर्कर्स पुढे व्हा आणि कुटुंबनियोजनाच्या कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: trupti desai said whats wrong with giving rubber sex organ for demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.