पुण्यात तृप्ती देसाई अन् रुपाली ठोंबरे पाटील यांच्यात अशोक खरातवरून जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:32 IST2026-03-23T12:31:28+5:302026-03-23T12:32:20+5:30

तृप्ती देसाईंनी खरात यांच्या काळ्या कृत्याचा पेन ड्राइव्ह मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवला, त्यामुळे ही कारवाई झाल्याचे सांगितले तर रूपाली ठोंबरेंनी देसाईंवर कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहाराचा आणि ‘तडजोडीचा’ खळबळजनक आरोप केला

Trupti Desai and Rupali Thombre Patil clash over Ashok Kharat in Pune | पुण्यात तृप्ती देसाई अन् रुपाली ठोंबरे पाटील यांच्यात अशोक खरातवरून जुंपली

पुण्यात तृप्ती देसाई अन् रुपाली ठोंबरे पाटील यांच्यात अशोक खरातवरून जुंपली

पुणे : राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरून पुण्यातील दोन महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आपण खरात यांच्या काळ्या कृत्याचा पेन ड्राइव्ह मुख्यमंत्री यांच्याकडे पोहोचवला, त्यामुळे ही कारवाई झाली, असे सांगितले आहे तर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी देसाई यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा आणि ‘तडजोडीचा’ खळबळजनक आरोप केला आहे.

भोंदू कॅप्टन खरातविरोधात वर्षभरापूर्वीच तक्रारी आल्या होत्या पण पोलिसांकडून त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. खरातला वाचवण्यासाठी पोलिसांनीच फिल्डिंग लावली होती का? असा प्रश्न भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, नाशिकचे ‘IG दत्तात्रय कराळे’ यांच्याबरोबर कॅप्टन अशोक खरात याचा फोटो मला आत्ता प्राप्त झाला आहे. मागील वर्षी अशोक खरात याच्यावर गुन्हा का दाखल होऊ शकला नाही? कारण नाशिक परिक्षेत्राचे IG दत्तात्रय कराळे होते. त्यामुळे खरातला पाठीशी घालण्यात आले, अशी आत्ताच मला फोनवरून माहिती मिळाली आहे. सगळंच अवघड आहे, महिलांबाबत असे वागणाऱ्या माणसाला कसं काय कोण पाठीशी घालू शकतं? असा सवालही तृप्ती देसाई यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी देसाई यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा आणि ‘तडजोडीचा’ खळबळजनक आरोप केला आहे. रूपाली पाटील यांच्या आरोपानुसार, अशोक खरात प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडीओ तृप्ती देसाई यांच्या ताब्यात आधीपासूनच होते. मात्र, हे व्हिडीओ सार्वजनिक करण्याऐवजी देसाई यांनी खरात यांच्या पत्नी आणि राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या तडजोडीत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला आहे.

रूपाली पाटील म्हणाल्या, “ज्या तृप्ती देसाई महिलांच्या हक्कासाठी लढण्याचा दावा करतात, त्यांनीच या प्रकरणात तडजोड कशी केली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, SIT कडून तृप्ती देसाई यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Web Title : पुणे में अशोक खरात को लेकर तृप्ति देसाई और रूपाली ठोंबरे पाटिल में टकराव

Web Summary : तृप्ति देसाई ने अशोक खरात की गिरफ्तारी का श्रेय लिया, मुख्यमंत्री को सबूत दिए। रूपाली ठोंबरे पाटिल ने देसाई पर करोड़ों में मामला निपटाने का आरोप लगाया, उनकी ईमानदारी पर सवाल उठाया। पाटिल ने एसआईटी जांच की मांग की।

Web Title : Trupti Desai and Rupali Thombre Patil clash over Ashok Kharat in Pune.

Web Summary : Trupti Desai claims credit for Ashok Kharat's arrest, presenting evidence to the CM. Rupali Thombre Patil alleges Desai settled the case for crores, questioning her integrity. Patil demands a SIT investigation.