शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत

By admin | Updated: August 20, 2015 02:34 IST

इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे फोडाफोडीच्या राजकारणात चांगलाच रंग भरला आहे

पळसदेव : इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे फोडाफोडीच्या राजकारणात चांगलाच रंग भरला आहे. काही विजयी उमेदवार अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत, तर काही ‘मेंबर’ निकाल लागल्यापासून गायब झाले.सरपंचपदाच्या निवडीत काही दगाफटका होऊ नये, म्हणून सरपंचपदाचे दावेदार विजयी उमेदवारांच्या सरबराईत गुंतले आहेत. त्यामुळे ‘सरपंचपदासाठी काय पण...’ अशी असा पणच दावेदारांनी केला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. काही मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये १५ ते २० वर्षांपासून असणारी सत्ता मतदारांनी उलथवून टाकली. आता सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडून आलेल्या पॅनलमध्ये फूट पडल्याचेही चित्र काही गावांमध्ये दिसत आहे. सरपंचपदाची अडीच वर्षांसाठी वाटणीही काही गावांमध्ये केली जात आहे. तर, काही ठिकाणी मीच कसा सरपंचपदासाठी लायक आहे, असे दावेदार तावातावाने सांगत आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारांच्या आणि दावेदारांच्या गुप्त बैठकाही सुरू आहेत. ज्या गावांमध्ये काठावरचे बहुमत आहे, त्या गावांमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. गावकीच्या राजकारणात सरपंचपद प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने विजयी उमेदवारांना लाखोच्या ‘आॅफर’ दिल्या जात आहेत. दरम्यान, निकाल लागल्यापासून अनेक नवनिर्वाचित मेंबर गोवा, महाबळेश्वर, तर काही श्रावण महिन्यानिमित्त १२ ज्योतिर्लिंगांच्या यात्रेस गेल्याची चर्चा ग्रामस्थांमधून ऐकण्यास मिळत आहे.