शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसमारंभातील अक्षतांचा वापर रानातल्या पाखरांसाठी

By admin | Updated: April 18, 2017 02:49 IST

लग्नसमारंभात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी अन्नधान्यापासून तयार केलेल्या अक्षतांचा वर्षाव वधू-वरांवर करण्याची आपली परंपरा आहे.

अशोक खरात, खोडदलग्नसमारंभात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी अन्नधान्यापासून तयार केलेल्या अक्षतांचा वर्षाव वधू-वरांवर करण्याची आपली परंपरा आहे. मात्र, लग्नसमारंभ झाल्यानंतर वधू-वरांवर वर्षाव केलेल्या या अक्षता पायदळी तुडवल्या जाऊन कचऱ्यात जातात. या अक्षता कचऱ्यात जाऊ न देता त्या सर्व अक्षता गोळा करून दुर्गम भागातील रानातील पाखरांना टाकून या पाखरांचा पोटाचा प्रश्न सोडविण्याचा उपक्रम उंब्रज नं. १ (ता. जुन्नर) येथील रवी जयराम हांडे यांनी गेल्या ३ वर्षांपासून सुरू केला आहे.आपण आपल्या घासातला घास एखाद्याला दिला तर निश्चितच आपले आणि ज्याला दिलाय त्याचीही भूक भागू शकते. पण आपण जर आपल्या घासातला घास किंवा आपल्याकडून नकळतपणे वाया जाणारे अन्नाचे कण जर निसर्गातील मुक्या जीवांना दिले, तर त्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही. शिवाय आपल्या हातून पर्यावरणाचे संवर्धन होत असल्याची सकारात्मक भावना मनाशी बाळगून रवी हांडे यांनी हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य हाती घेतले. सध्या लग्नसराईचा काळ आहे. अनेक ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या तर काही ठिकाणी खासगी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह होत आहेत. जुन्नर तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे होतात, अशा सर्वच ठिकाणी व देवस्थान ट्रस्ट असलेल्या ठिकाणी जाऊन सोहळा पार पडल्यानंतर मंडपातील किंवा हॉलमधील सर्व अक्षता गोळा करून त्या आणल्या जातात. या अक्षतांना खाद्यपदार्थांना वापरले जाणारे रंग लावलेले असतात.