शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वृक्षारोपण एकट्या वनखात्याची जबाबदारी नाही, ते सर्वांचे कर्तव्य- गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 1:09 PM

वृक्ष लागवड करणे सोपे आहे, मात्र त्यापेक्षा त्याची देखभाल करणे तितकेच आव्हानात्मक काम आहे. या पुढील काळात प्रत्येक नागरिकाने किमान पाच झाडे लावण्याची जबाबदारी स्वीकारून वृक्षरोपणास हातभार लावला पाहिजे.

पुणे : वृक्ष लागवड करणे सोपे आहे, मात्र त्यापेक्षा त्याची देखभाल करणे तितकेच आव्हानात्मक काम आहे. या पुढील काळात प्रत्येक नागरिकाने किमान पाच झाडे लावण्याची जबाबदारी स्वीकारून वृक्षरोपणास हातभार लावला पाहिजे. वृक्षारोपण ही केवळ एकट्या वनखात्याची जबाबदारी नसून ती सर्वांची आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात बापट बोलत होते. याप्रसंगी आमदार विजय काळे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक जितसिंग, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, लक्ष्मी ए, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी  सूरज मांढरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.बापट म्हणाले, वृक्षारोपण सारख्या महत्त्वाच्या उपक्रमाचे श्रेय वनविभागाला द्यावे लागेल. भविष्यात पर्यावरणाचे स्वरूप काय असेल, किती भयानक परिस्थतीला आपणाला सामोरे जावे लागेल याचा अभ्यास करून त्यांनी वनीकरनाचा उपक्रम हाती घेतला आहे. समाजात गुटगुटीत निसर्ग फुलला पाहिजे यासाठी कुणा एकट्याचे प्रयत्न पुरेसे नसून त्यात सार्वजनिक पातळीवर एकजुटीने सामाजिक वृक्षारोपणाचा संदेश रुजायला हवा. याबरोबरच निसर्गाशी भांडण न करता त्याला सोबत घेऊन काम करण्याची गरज असून नागरिकांनी केवळ संकल्पावर विसंबून न राहू नये. खरे तर दहा वर्षांपूर्वीच  पर्यावरणाच्या जनजागृती बद्दल विविध पातळीवर प्रयत्न व्हायला हवे होते . मात्र ते न झाल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम हाती घ्यावा लागत आहे. अशा शब्दांत बापट यांनी विरोधी पक्षावर टीका केली.   यावेळी उपस्थित अधिकारी, विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी वृक्षप्रतिज्ञा घेतली. तसेच पालकमंत्री व अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वनाधिकारी सत्यजित गुजर यांनी आभार मानले.२०० झाडामागे नेमणार एक पालककेवळ झाडे लावून प्रश्न सुटणार नसून त्याची देखभाल करणे हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. याकरिता शासनाच्या वतीने यापुढील काळात २०० झाडांमागे त्याचे संगोपन करण्याकरिता एक पालक नेमणार आहे. त्या झाडांचे पालकत्व घेणाऱ्या कुटुंबाला वर्षाला ५ हजार रुपये देण्यात येणार असून त्या झाडांच्या देखभालिची जबाबदारी त्या कुटुंबावर सोपविण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले. हे पालकत्व म्हणजे वृक्षारोपण उपक्रमाला भावनात्मक जोड देण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.प्रत्येक झाडाला जिओ टॅग करणारराज्यात सातत्याने कमी होत चाललेल्या वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी वृक्षारोपण स्तुत्य उपक्रम असून आतापर्यंत जी झाडे लावण्यात आलेली आहेत त्यांच्या देखभालीसाठी त्या प्रत्येक झाडांवर जिओ टॅग लावणार असल्याची माहिती डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली. यामुळे सबंधित झाड हे कुठल्या अवस्थेत आहे याची माहिती मिळण्यास मदत होणार असून जास्तीत जास्त वृक्षारोपण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणे