शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासाचा वेग वाढणार; हायस्पीड मार्गामुळे पुणे-मुंबई दीड तासात तर हैद्राबादला ४ ते ५ तासात जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:14 IST

पुणे ते हैदराबाद मार्गामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांमधील औद्योगिक, व्यापारी व्यवसायाला चालना मिळणार आहे

पुणे : मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन/सेमी हायस्पीड) रेल्वे कॉरिडॉर बनवणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी रविवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकात केली. या दोन प्रकल्पांमुळे रेल्वे प्रवासाचा वेळ कमी होणार असून, दळणवळणाचा वेग वाढणार आहे. यामुळे आयटी, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, हायस्पीड मार्गामुळे पुणे-मुंबई दरम्यानचे अंतर केवळ एक ते सव्वा तासात गाठता येणार आहे.

हायस्पीड रेल्वे मार्ग भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुणे-मुंबई दरम्यान सध्या रेल्वे किंवा रस्तेमार्गे प्रवासासाठी सुमारे ४ ते ५ तास लागतात. प्रस्तावित हायस्पीड रेल्वेमुळे हा प्रवास अवघ्या एक ते सव्वा तासांत होऊ शकते. तसेच पुणे ते हैदराबाद दरम्यान रेल्वे प्रवासाला आठ ते दहा तास वेळ लागतो. हायस्पीड रेल्वे मार्ग झाल्यावर चार ते साडेचार तासांत प्रवास होण्याची शक्यता आहे. पुणे ते हैदराबाद मार्गामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांमधील औद्योगिक, व्यापारी व्यवसायाला चालना मिळणार आहे. या रेल्वेसाठी स्वतंत्र लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. केंद्राकडून मंजुरी मिळाल्यामुळे या प्रकल्पासाठी मार्गाची पाहणी, तांत्रिक अभ्यासाच्या आढावाला गती मिळणार आहे. या दोन मार्गांसह इतर पाच हायस्पीड मार्गांची घोषणा झाल्यामुळे आराखड्यास (डीपीआर) तयार करण्यासाठी लवकरच ग्रीन सिग्नल मिळेल.

हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे संभाव्य फायदे

- पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ ३ ते ४ तासांवरून एक ते दीड तासापर्यंत कमी होणार- पुणे-हैदराबाद प्रवासाचा वेळ ८ ते ९ तासांवरून ४ ते ५ तासांपर्यंत घट- उद्योग, आयटी, शिक्षण व आरोग्य क्षेत्राला मोठा लाभ- पर्यावरणपूरक वाहतूक व कार्बन उत्सर्जनात घट- रस्ते व विमान प्रवासावरील ताण कमी होणार

प्रकल्पाच्या ठळक बाबी...

- भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प- रेल्वेचा वेग - २२० ते ३५०- पुणे-हैदराबाद अंतर - ५५६- महाराष्ट्राबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मार्ग जाणार- प्रमुख शहर - पुणे, सोलापूर, वाडी

प्रवास होणार सुकर

- हायस्पीड रेल्वे २५० ते ३०० किमी/तास वेगाने धावते.- हायस्पीड रेल्वे कार व विमानांच्या तुलनेत कमी कार्बन उत्सर्जन करते.- त्यामुळे प्रदूषण कमी होते. हरित ऊर्जेला चालना मिळते.- शहरांचा विकास, उद्योगधंद्यांना चालना, पर्यटन वाढ आणि रोजगारनिर्मिती होते.- स्टेशन परिसरात व्यापारी केंद्रे विकसित होतात. आर्थिक विकासाला गती मिळते.- प्रगत सिग्नलिंग प्रणाली, स्वतंत्र ट्रॅक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अपघातांची शक्यता खूप कमी असते.- कमी कंपन, आरामशीर आसने, शांत वातावरण आणि आधुनिक सुविधा मिळतात.

English
हिंदी सारांश
Web Title : High-Speed Rail to Slash Pune-Mumbai, Hyderabad Travel Times

Web Summary : Pune and Mumbai will be connected in 1.5 hours via high-speed rail. Pune-Hyderabad travel time will be reduced to 4-5 hours, boosting industry and connectivity. The project promises economic growth, reduced emissions, and enhanced travel comfort, fostering regional development.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प २०२६railwayरेल्वेMumbaiमुंबईpassengerप्रवासीnirmala sitharamanनिर्मला सीतारामनMONEYपैसा