शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक वाहन क्रमांकातून परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयाची २७ कोटींची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 17:43 IST

आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी असलेल्यांमध्ये वाढ होत आहे. परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयांतर्गत मागील आठ महिन्यांत ३६ हजार जणांनी या क्रमांकांसाठी तब्बल २७ कोटी रुपये मोजले आहेत.

ठळक मुद्देयावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांत विभागातून ३६ हजार चालकांनी घेतला आकर्षक क्रमांक वाहनांना आकर्षक क्रमांकासाठी सर्वाधिक पसंती पुणे कार्यालयाला

पुणे : आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी असलेल्यांमध्ये वाढ होत आहे. परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयांतर्गत मागील आठ महिन्यांत ३६ हजार जणांनी या क्रमांकांसाठी तब्बल २७ कोटी रुपये मोजले आहेत. तर सात जणांनी सरासरी प्रत्येकी चार लाख रुपये दिले आहेत. 
परिवहन विभागाकडून दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी काही आकर्षक क्रमांक राखून ठेवले जातात. यामध्ये १, १००, ७८६, ४१४१ अशा विविध क्रमांकाचा समावेश असतो. प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) या क्रमांकासाठी अर्ज मागवून त्यानुसार लिलाव पध्दतीने हे क्रमांक संबंधित वाहनासाठी दिले जातात. त्यासाठी चार लाख रुपयांपर्यंत बोली लावता येवू शकते. मागील आर्थिक वर्षामध्ये पुणे विभागाला या लिलावातून तब्बल ३७ कोटी ३० लाख रुपयांची कमाई झाली होती. तर यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत विभागातून सुमारे ३६ हजार चालकांनी आकर्षक क्रमांक घेतला आहे. यातून २७ कोटी १७ लाख रुपयांचे उत्पन्न आरटीओला मिळाले आहे. 
पुणे विभागांतर्गत आरटीओ पुणे, उप प्रादेशिक परिवहन कार्यलय सोलापूर, पिंपरी चिंचवड, बारामती आणि अकलुज या कार्यालयांचा समावेश होतो. वाहनांना आकर्षक क्रमांकासाठी सर्वाधिक पसंती पुणे कार्यालयाला दिली जाते. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडचा क्रमांक लागतो. एका क्रमांकासाठी चार लाख रुपये मोजणारे हौशी वाहनचालकही वाढू लागले आहेत. मागील आठ महिन्यांत सात चालकांनी सुमारे प्रत्येकी चार लाख रुपये मोजले आहेत. तर एक लाखांहून अधिक रक्कम मोजणाºयांची संख्या १२९ एवढी आहे. यातून पुणे विभागाला सुमारे २ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आरटीओला यातून मिळणाºया उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्षातील अद्याप चार महिने बाकी असल्याने यंदा नवीन नोंदणीतून मिळणारे उत्पन्न मागील वर्षीपेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे.
 

आठ महिन्यांतील कार्यालय निहाय नोंदणी व उत्पन्न : 

कार्यालय             नोंदणी संख्या   उत्पन्न
पुणे                      २१४८६              १५ कोटी ६९ लाख
सोलापूर               २५९८                १ कोटी ७३ लाख
पिंपरी चिंचवड     ९३९३                 ७ कोटी ८६ लाख
बारामती              २२८२                १ कोटी ७८ लाख
अकलुज               २३४                  १२ लाख
----------------------------------------------------------
एकूण                  ३५९९३                २७ कोटी १७ लाख
----------------------------------------------------------

शुल्कनिहाय वाहन नोंदणी
शुल्क                                      नोंदणी

५ हजारापर्यंत                           २५६६०        
५०००१ ते ७५००                        ५४६९
७५०१ ते १०,०००                       ६२१
१०,००१ ते २०,०००                    १९११
२०,००१ ते ५०,००१                    २१११
५०,००१ ते १,०००००                  ९२
१,००००१ ते २,५०,०००              १२२
२,५०,००१ व त्यापुढे                  ७
 

टॅग्स :pune rtoपुणे आरटीओPuneपुणे