Transport of village liquor by Scorpio vehicle; Police seized worth Rs 4 lakh 59,500 materials | स्कॉर्पिओ गाडीतून गावठी दारूची वाहतूक; पोलिसांकडून ४ लाख ५९ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त

स्कॉर्पिओ गाडीतून गावठी दारूची वाहतूक; पोलिसांकडून ४ लाख ५९ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर : स्कॉर्पिओ गाडीतून गावठी दारूची वाहतूक करण्यात सुरु होती. पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान १ हजार १९० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दारूसह स्कॉर्पिओ असा एकूण ४ लाख ५९ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
         

याप्रकरणी गोविंद सखाराम गायकवाड ( वय २४, रा.भाटनगर, पिंपरी, पिंपरी चिंचवड, पुणे ) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सोमवारी ( दि. ३०) सकाळी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना बातमीदारामार्फत एका चारचाकी वाहनातून गावठी हातभट्टीची तयार दारू शिंदवणे येथुन पिंपरी चिंचवड येथे थेऊर मार्गे विक्रीसाठी नेण्यात येणार आहे याची माहिती मिळाली होती. या माहितीचा आधार घेऊन थेऊर फाटा येथे पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (एमएच १४ एई १२९४) आल्यावर पोलिसांनी तिला अडवले. या वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील सीटवर ३४ प्लॅस्टिकच्या प्रत्येक कॅनमध्ये ३५ लिटर अशी एकुण १ हजार १९० लिटर गावठी हातभट्टीची दारू असल्याचे समोर आले. ५९ हजार ५०० रूपये किंमतीच्या दारू व ४ लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ४ लाख ५९ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Transport of village liquor by Scorpio vehicle; Police seized worth Rs 4 lakh 59,500 materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.