Pune: तृतीयपंथींनी महिलेकडे रुपया मागत पळवले अडीच हजार, सेनापती बापट रस्त्यावर प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 10:32 IST2023-10-09T10:32:17+5:302023-10-09T10:32:56+5:30

पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील चौकात सिग्नलला रिक्षा थांबली. या रिक्षात महिला प्रवासी प्रवास करत होती. त्या महिलेच्या पिशवीमधून ...

transgender ran away asking the woman for Rs 2,500, Senapati Bapat street | Pune: तृतीयपंथींनी महिलेकडे रुपया मागत पळवले अडीच हजार, सेनापती बापट रस्त्यावर प्रकार

Pune: तृतीयपंथींनी महिलेकडे रुपया मागत पळवले अडीच हजार, सेनापती बापट रस्त्यावर प्रकार

पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील चौकात सिग्नलला रिक्षा थांबली. या रिक्षात महिला प्रवासी प्रवास करत होती. त्या महिलेच्या पिशवीमधून अडीच हजार रुपये तृतीयपंथींनी लांबवल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तृतीयपंथींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या माॅडेल काॅलनीत राहायला आहेत. तक्रारदार महिला आणि नातेवाईक महिला रिक्षातून सेनापती बापट रस्त्याने निघाल्या होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकात रिक्षा सिग्नलला थांबली. त्यावेळी दोन तृतीयपंथी रिक्षाजवळ आले. त्यांनी महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेने त्यांना दहा रुपये दिले. त्यानंतर दोघांनी महिलेकडे १ रुपया मागितला.

महिलेने पिशवी उघडली. तेव्हा चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील अडीच हजार रुपयांची रोकड हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत तृतीयपंथी पसार झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रूपेश चाळके करत आहेत.

Web Title: transgender ran away asking the woman for Rs 2,500, Senapati Bapat street