जेजुरी रेल्वे स्थानकाचा कायापालट; स्थानकाला खंडोबा देवस्थानाचे रूप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 01:26 PM2019-11-05T13:26:22+5:302019-11-05T13:30:30+5:30

रेल्वेकडून धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहरांमधील रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटले जात आहे.

Transformation of Jejuri Railway Station; Khandoba as a place of worship | जेजुरी रेल्वे स्थानकाचा कायापालट; स्थानकाला खंडोबा देवस्थानाचे रूप

जेजुरी रेल्वे स्थानकाचा कायापालट; स्थानकाला खंडोबा देवस्थानाचे रूप

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे स्थानकाचे हे प्रवेशद्वार भाविक प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू

पुणे : मध्य रेल्वेनेजेजुरीरेल्वे स्थानकाला खंडोबा देवस्थानाचे रूप देऊन कायापालट केला आहे. स्थानकाचे प्रवेशद्वार हुबेहूब देवस्थानाच्या प्रवेशद्वारप्रमाणे साकारण्यात आल्याने भाविक प्रवाशांच्या पसंतीस उतरले आहे. 
रेल्वेकडून धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहरांमधील रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटले जात आहे. या भागात येणाºया रेल्वे प्रवाशांसाठी ही शहरे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. या अनुषंगाने प्रवाशांना रेल्वे स्थानकात आल्यानंतर सुखद अनुभव मिळावा यासाठी देशभरात हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. स्थानिक ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व, संस्कृती विचारात घेऊन संबंधित स्थानकाचे रुपडे पालटले जात आहे. या पार्श्वभूमीवर जेजुरी रेल्वे स्थानकाला नवे रूप देण्यात आले आहे. येथील खंडोबा देवस्थानाचे आकर्षक रुप साकारण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाचे हे प्रवेशद्वार भाविक प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. 


याशिवाय प्रवाशांना स्थानकात विविध सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. फलाट क्रमांक एकची लांबी वाढवून २४ डब्यांसाठी करण्यात आली आहे. तसेच फलाटाची उंची वाढवून त्याचे नूतनीकरणही करण्यात आले आहे. 
......
फलाटावर सुमारे १ हजार चौरस मीटरचे छत टाकण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना ऊन व पावसापासून दिलासा मिळणार आहे. पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आल्याने प्रवाशांना शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे. दरम्यान, रेल्वेस्थानकाला देवस्थानचे रुप देण्यात आल्याने प्रवाशांनी स्वच्छता राखावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.  

Web Title: Transformation of Jejuri Railway Station; Khandoba as a place of worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.