Transfers : शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; शहरात नव्याने दाखल होणार 'हे' अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:14 IST2025-05-17T12:13:14+5:302025-05-17T12:14:22+5:30

- पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे अपर पोलिस आयुक्तपदी बदली

Transfers of senior police officers in the city Superintendent of Police Pankaj Deshmukh transferred as Additional Commissioner of Police, Pune | Transfers : शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; शहरात नव्याने दाखल होणार 'हे' अधिकारी

Transfers : शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; शहरात नव्याने दाखल होणार 'हे' अधिकारी

पुणे : पुण्यातील तीन अपर पोलिस आयुक्तांची अन्य शहरांत बदली करण्यात आली. यावेळी पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहर पोलिस दलात पदोन्नतीने अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांची बृहन्मुंबई येथे गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी, अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया यांची अमरावती पोलिस आयुक्तपदी, तर अपर पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांची नागपूर येथे अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली. या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी (दि. १६) रात्री काढण्यात आले.

शहरात नव्याने दाखल होणारे अधिकारी...

नाव - कुठून - कुठे

१) पंकज देशमुख - पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर

२) संजय बी. पाटील - अपर पोलिस आयुक्त, नागपूर ते अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर

३) राजेश बनसोडे - पोलिस अधीक्षक, बिनतारी, पुणे ते अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर

४) अमोघ गावकर - पोलिस उपायुक्त, प्रतिबंध, बृहन्मुंबई ते पोलिस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, प्रशासन, पुणे

५) जी. श्रीधर - पोलिस उपमहानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ते पोलिस उपमहानिरीक्षक, पोलिस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, पुणे

६) विजय मगर - प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, लातूर ते पोलिस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे

Web Title: Transfers of senior police officers in the city Superintendent of Police Pankaj Deshmukh transferred as Additional Commissioner of Police, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.