शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

परप्रांतियांना सोडण्यास नकार देणाऱ्या ट्रक चालकाला प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 9:23 PM

नारायणगाव परिसरात ट्रक चालकाला मारहाण केल्याचे तीव्र पडसाद

ठळक मुद्देसंबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी अशी मागणी

नारायणगाव : परप्रांतीयांना मंचर येथे सोडण्यास नकार देणारया ट्रक चालकाला नारायणगाव पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने अमानुषपणे काठीने मारहाण केली. या मारहाणीत ट्रक चालकाच्या उजव्या हाताचे एक बोट फ्रॅक्चर झाले असून अनेक ठिकाणी मारहाणीमुळे सूज आली आहे. दरम्यान, ट्रक चालकाला मारहाण केल्याचे तीव्र पडसाद नारायणगाव परिसरात उमटले आहेत. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी अशी मागणी नारायणगाव येथील नागरिक , ट्रक व्यावसायिक आणि जगताप कुटुंबीयांकडून केली जात आहे.

दिनेश चंद्रकांत जगताप (रा. कोल्हे मळा , नारायणगाव ) असे मारहाण झालेला ट्रक चालकाचे नाव आहे. तर मारहाण करणारे पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे नारायणगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहेत . दरम्यान , पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे .

याबाबत अधिक माहिती अशी, ट्रक चालक दिनेश जगताप हे मंगळवारी मध्यरात्री रात्री संगमनेर येथून कोंबडीचे खत टाकून नारायणगावच्या दिशेने मालवाहतूक ट्रक घेऊन येत होते. कांदळी वडगाव हद्दीत आले असताना नारायणगाव पोलिसांनी त्यांची ट्रक थांबविली. यावेळी तेथे असलेले पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी ट्रकचालकाला सांगितले , मध्यप्रदेश मधल्या या ६० ते ७० नागरिकांना मंचर याठिकाणी सोड. यावर ट्रक चालक जगताप यांनी सांगितले,साहेब, मी सकाळपासून उपाशी आहे. मला झोपेची नितांत गरज आहे. माझी मालवाहतूक ट्रक आहे , माझ्या  गाडीला प्रवासी वाहतूक परवाना नाही, मी ह्या नागरिकांना सोडू शकत नाही.  असे म्हणताच अधिकारी पवार यांनी, तू पोलिसांचे म्हणणे ऐकत नाही. तुला पोलीस म्हणजे काय हे समजत नाही का ? असे चालक जगताप यास काठीने बेदम मारहाण करण्यास सुरवात केली.पोलीस अधिकारी पवार हे मारहाण करून थांबले नाही तर पोलीस कर्मचाऱ्यांना सांगून ट्रक पोलीस स्टेशनला आणण्यास भाग पाडले. जखमी अवस्थेत जगताप यांनी ट्रक गाडी पोलीस स्टेशनला घेऊन आले. ही घटना जगताप यांच्या कुटुंबियांना समजल्यावर ते पोलीस ठाण्यात आले नंतर पोलिसांनी जगताप यांना उपचारासाठी रात्री उशिरा सोडले.कोरोना पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण आहे हे आपण समजू शकतो. त्यांच्या प्रती आदर देखील आहे , मात्र त्यांनी कुणालाही मारहाण करावी हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. मारहाण करण्याबाबत आपण अधिकाऱ्यांना योग्य ती समज व सूचना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली .

टॅग्स :narayangaonनारायणगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी