पुण्यातील संतापजनक प्रकार! वडीलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 13:28 IST2022-05-15T13:28:18+5:302022-05-15T13:28:31+5:30
पुणे : एका २३ वर्षांच्या तरुणीला गेली ११ वर्षे तिचे वडील जबरदस्तीने घरातील कॉम्प्युटर व त्यांच्या मोबाइलवर पोर्नोग्राफीचे व्हिडीओ ...

पुण्यातील संतापजनक प्रकार! वडीलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडीओ
पुणे : एका २३ वर्षांच्या तरुणीला गेली ११ वर्षे तिचे वडील जबरदस्तीने घरातील कॉम्प्युटर व त्यांच्या मोबाइलवर पोर्नोग्राफीचे व्हिडीओ दाखवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिची आई व बहीण हे घरगुती कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे या तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार येरवडा येथील कल्याणीनगरमधील एका सोसायटीत २०१० ते २०२१ दरम्यान सुरू होता. याबाबत एका २३ वर्षांच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तिचे वडील, आई व बहिणीवर विनयभंगासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही एका कंपनीत सध्या काम करीत असून तिचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. फिर्यादीचे वडिलांनी हे तिची इच्छा नसताना वेळोवेळी घरातील कॉम्प्युटर व त्यांच्या मोबाइलवर पोर्नोग्राफी व्हिडीओ दाखवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तिची आई व बहीण यांनी फिर्यादी यांना घरगुती कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली. बहिणीने फिर्यादीचे अंतवस्त्रातील फोटो व व्हिडीओ काढले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने आपली तक्रार प्रथम हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली होती. तेथून ती वर्ग होऊन येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.