शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मोदीजींचा वाहनताफा लवकर जाईना अन् नवरा मंडपात येईना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 1:36 PM

वऱ्हाडी मंडळी कंटाळली

ठळक मुद्देरुबी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर त्या भागात प्रचंड वाहतूककोंडी

पुणे : लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागला होता. परंतु, वरपक्षाची वरात मंडपात आली नव्हती. त्यामुळे वधूपक्षाकडील मंडळी चांगलीच वैतागली होती. कारण वरपक्षाची वरात वाहतूककोंडीत अडकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा या परिसरात येत असल्याने सर्वत्र रस्ते बंद केले होते. परिणामी कोंडीचा फटका नवरदेवाच्या वरातीला बसला. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे नेते आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांची भेट घेण्यासाठी रुबी हॉस्पिटलला आले होते. सुरक्षा आणि प्रोटोकॉलनुसार अनेक गाड्यांचा ताफा त्यांच्यासमवेत होता. मोदी रुबी हॉस्पिटलला जाईपर्यंत आणि तेथून निघेपर्यंत त्या भागातील वाहतुकीची कोंडी झाली. मात्र या सगळ्याचा फटका एका नवरोबाला सहन करावा लागला. या नवमुलाची मिरवणूक नेमकी याच रस्त्याने अल्पबचत भवनच्या दिशेने निघाली होती. पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा, आजुबाजुला असलेली वाहतूककोंडीच्या गराड्यात नवरा आणि मिरवणूक अडकून पडली. दुसरीकडे लग्नमंडपात सर्वजण नवºया मुलाची वाट पाहून  मंडळी कंटाळून गेली होती. मोदींचा वाहनाचा ताफा रुबीच्या दिशेने मार्गस्थ झाला. यावेळी वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियोजन क रताना दिसत होते. मोदी रुबी हॉस्पिटलपर्यंत पोहचेपर्यंत मालधक्का चौक, आरटीओ चौक, मंगलदास रस्ता येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान अल्पबचत भवन येथे असणाऱ्या एका नवऱ्यामुलाची मिरवणूक सुरू होती. परंतु मोदींच्या गाडयांचा ताफा हॉस्पिटलजवळ आल्याने आसपासचे सर्वच मार्ग बंद होते. अशावेळी मिरवणूक त्या वाहतूककोंडीतून मार्ग काढत लग्नस्थळी जाण्याचा प्रयत्न करत होती. मोठ्या आनंद व उत्साहात मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळींची मात्र या वाहतूककोंडीमुळे नाराजी झाली. त्यांना सातत्याने वाहनचालकांच्या रागाला सामोरे जावे लागत होते. साधारण तासाभराने या भागातील वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत लग्नस्थळी मिरवणुकीची वाट पाहणारी मंडळी कंटाळून गेल्याचे दृश्य दिसून आले. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसmarriageलग्न