मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 12:52 PM2019-09-01T12:52:56+5:302019-09-01T12:54:08+5:30

गणेशोत्सव आणि रविवारची सुट्टी यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे.

traffic jam on mumbai pune expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी 

Next

लोणावळा - गणेशोत्सव आणि रविवारची सुट्टी यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अमृतांजन पूल, खंडाळा व आडोशी बोगदा परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

शनिवार व रविवारच्या सुट्टीला जोडून गणपतीची सुट्टी आल्याने पर्यटकांप्रमाणेच कोकणवासीय तसेच कामानिमित्त परगावी गेलेले नागरिक गावांकडे जाण्यास निघाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाट परिसरात मुंबई व पुणे या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यातच दोन दिवसांपासून पावसाचे पुर्नरागमन झाल्याने घाट भागात पाऊस व धुके असल्याने वाहने धीम्या गतीने जात आहे. खंडाळा महामार्ग व बोरघाट पोलीस वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी वाहनांची संख्या जास्त असल्याने रांगा लागल्या आहेत.

Web Title: traffic jam on mumbai pune expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.