Shivaji Road Pune: शिवाजी रस्त्यावर रात्री १० ते सकाळी ६ वाहतूक बंद, पर्यायी मार्ग जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 09:48 IST2025-08-05T09:48:15+5:302025-08-05T09:48:47+5:30

भिडेवाडा स्मारकाचे काम सुरू होताच, वाहतुकीतील बदल करण्यात येणार असून हा बदल २५ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे

Traffic closed on Shivaji Road from 10 pm to 6 am, alternative route announced | Shivaji Road Pune: शिवाजी रस्त्यावर रात्री १० ते सकाळी ६ वाहतूक बंद, पर्यायी मार्ग जाहीर

Shivaji Road Pune: शिवाजी रस्त्यावर रात्री १० ते सकाळी ६ वाहतूक बंद, पर्यायी मार्ग जाहीर

पुणे : शिवाजी रस्त्यावरील भिडेवाडा स्मारकाच्या बांधकामासाठी शिवाजी रस्त्यावरील बुधवार चौकातील वाहतूक रात्रीच्या वेळेत (रात्री दहा ते सकाळी सहा) पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना जंगली महाराज रस्ता-टिळक रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जावे लागणार आहे.

फरासखाना वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वाहतूक बदलासाठी २ ऑगस्टपासून मंजुरी देण्यात आली. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे वाहतूक सुरू आहे. काम सुरू होताच, वाहतुकीतील बदल करण्यात येणार आहे. हा बदल २५ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. स. गो. बर्वे चौकातून स्वारगेटकडे जाण्यासाठी जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्यामार्गे स्वारगेटला जावे. महापालिकेकडे जाऊ इच्छिणाऱ्यांनी जंगली महाराज रस्त्याने झाशीची राणी चौकातून डावीकडे जावे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, बिजली शॉपपासून उजवीकडे वळून श्रीकृष्ण टॉकीज- सिटी पोस्ट-लक्ष्मी रस्त्यामार्गे जावे लागते. नागरिकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

Web Title: Traffic closed on Shivaji Road from 10 pm to 6 am, alternative route announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.