बंड गार्डन, कोरेगाव पार्क येथील वाहतुकीत बदल, माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:51 AM2024-02-24T11:51:53+5:302024-02-24T11:53:33+5:30

कोरेगाव पार्क, बंडगार्डन विभागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे...

Traffic changes at Bund Garden, Koregaon Park, Know alternative routes | बंड गार्डन, कोरेगाव पार्क येथील वाहतुकीत बदल, माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

बंड गार्डन, कोरेगाव पार्क येथील वाहतुकीत बदल, माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : साधू वासवानी उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत कोरेगाव पार्क, बंडगार्डन विभागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. शनिवार (दि. २४) ते पुढील आदेश येईपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर हा बदल असणार आहे.

या मार्गावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारच्या जड, अवजड, मल्टिॲक्सल वाहनांना २४ तास बंदी करण्यात येत आहे, माहिती वाहतूक पोलिस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.

असा पर्यायी मार्ग :

- नगर रस्त्यावरून मोर ओढा चौकाकडे जाणारी वाहने पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, ब्ल्यू डायमंड चौक उजवीकडे वळून मंगलदास रोडने माेबाज चौक, डावीकडे वळून मंगलदास चौकी समोरून पुन्हा डावीकडे वळून आयबी (रेसिडेन्सी क्लब) चौक, डावीकडे वळून सर्किट हाऊस चौक, मार्गे मोर ओढा चौकाकडे, मोर ओढा चौक.

- कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहने मोर ओढा चौक, सरळ कौन्सिल हॉल चौक, उजवीकडे वळून मंगलदास चौक, उजवीकडे वळून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळून कोरेगाव पार्ककडे जातील.

- पुणे स्टेशन येथून कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहने पुणे स्टेशन, अलंकार चौक, डावीकडे वळून जहाँगीर चौक, उजवीकडे वळून मंगलदास चौक, पुणे स्टेशन अलंकार चौक सरळ आय. बी. चौक, डावीकडे वळून मंगलदास चौक, उजवीकडे वळून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळून कोरेगाव पार्क.

- पुणे स्टेशन ते घोरपडीकडे जाणारी वाहने पुणे स्टेशन ते अलंकार चौक सरळ सर्किट हाऊस चौकमार्गे मोर ओढा चौक, मार्गे इच्छितस्थळी जातील.

- घोरपडी व भैरोबानाला चौकाकडून येणाऱ्या सर्व बस (पीएमपीसह) मोर ओढा चौकाकडून सरळ जाऊन काहूर रोड जंक्शनवरून डावीकडे वळण घेऊन तारापूर रोड जंक्शनवर येतील आणि उजवीकडे वळण घेऊन तारापूर रोडने ब्लू लाइन चौकाकडून उजवीकडे वळण घेऊन कॉन्सिल हॉल चौकमधून इच्छितस्थळी जातील. आय.बी. (रेसिडेन्सी क्लब) जंक्शन ते मोर ओढा चौक हा एकेरी मार्ग आवश्यक त्यावेळेस तात्पुरता दुहेरी करण्यात येईल.

बंडगार्डन, कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गत पर्णकुटी चौक ते ब्ल्यू डायमंड चौक ते मोबाज चौक, मोबाज चौक ते महात्मा गांधी उद्यान चौक (बंडगार्डन रोड), अलंकार चौक ते आय. बी. चौक ते सर्किट हाऊस चौक, मोर ओढा चौक ते कौन्सिल हॉल चौक, साधू वासवानी पुतळा मार्ग एकेरी करण्यात येत आहे. काहून रोड जंक्शन ते तारापूर रोड जंक्शन हा रस्ता पूर्वीप्रमाणे एकेरी मार्ग राहील.

Web Title: Traffic changes at Bund Garden, Koregaon Park, Know alternative routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.