शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परंपरा पालखीसोहळ्याची

By admin | Updated: July 9, 2015 02:38 IST

संत आणि भगवंताची भेट घडविण्यासाठी तुकोबारायांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायणमहाराज यांनी सुरू केलेल्या पालखी सोहळ्याची परंपरा देहूकरांनी आजही अखंड सुरू ठेवली आहे.

मंगेश पांडे, पिंपरीसंत आणि भगवंताची भेट घडविण्यासाठी तुकोबारायांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायणमहाराज यांनी सुरू केलेल्या पालखी सोहळ्याची परंपरा देहूकरांनी आजही अखंड सुरू ठेवली आहे. सकळा वैष्णव वाटे जीव, प्राणतो हा नारायण देहूकर अशाप्रकारे निळोबारायांनी आपल्या अभंगात नारायण महाराजांचे वर्णन केले आहे. पालखी सोहळ्याला ३३० वर्षांपूर्वी सुरुवात झाली. तुकाराममहाराजांचे तृतीय चिरंजीव नारायणमहाराज माऊली-तुकोबारायांच्या पादुका घेऊन आषाढी वारीसाठी पंढरीला जात. पालखी सोहळ्याचे जनक नारायणमहाराज यांची देहूतील मुख्य देऊळवाड्याच्या उत्तर दिशेला समाधी आहे. शेजारीच पवित्र इंद्रायणी नदी आहे. या स्थळालादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी येथे समाधी व त्यावर जुन्या पद्धतीचे बांधकाम होते. तसेच समोरची जागाही अपुरी होती. २००४ ला संस्थानने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपूर्ण मंदिराचे बांधकाम मार्बलमध्ये करण्यात आले. सुंदर आणि रेखीव असे हे मंदिर सध्या येथे उभे आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी अगोदर नारायणमहाराजांच्या पादुकांचे पूजन केले जाते. मुख्य देऊळवाड्यात विठ्ठल-रुक्मिणी स्वयंभू मूर्ती, राम मंदिर, महादेव मंदिर, शिळा मंदिर येथील दर्शनानंतर भाविक उत्तर दरवाजाने नारायणमहाराज यांच्या समाधी दर्शनासाठी जातात.दर वर्षी श्रावण महिन्यात नारायणमहाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त संस्थानाकडून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सात दिवसांचा हरिनाम सप्ताह असतो. नारायणमहाराजांनी सुरू केलेली पालखी सोहळ्याची परंपरा देहूकरांनी कायम ठेवली आहे. नारायणमहाराज यांच्यानंतर देहूकरांसह विविध दिंड्या सोहळ्यात सहभागी होऊ लागल्या. दर वर्षी सोहळ्याचा विस्तार वाढतच आहे. ज्येष्ठांसह तरुणांचाही सहभाग वाढत आहे. प्रस्थान सोहळ्याने आषाढी वारीला सुरुवात होते. हा पालखी सोहळा म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. मनात भगवंताच्या भेटीची आस आणि मुखी हरिनामाचा गजर असतो. पालखी पंढरीकडे मार्गस्थ होत असताना मार्गात भारूड, गोल व उभे रिंगण आदी कार्यक्रम असतात. लहान-मोठा असा भेदभाव नसतो. पहिला मुक्काम इनामदारवाड्यात प्रस्थान झाल्यानंतर पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदारवाड्यात असते. मुख्य देऊळवाड्याच्या शेजारी दक्षिण दिशेला अवघ्या पन्नास मीटर अंतरावर हा वाडा आहे. येथे तुकोबारायांचे छोटे मंदिरदेखील आहे. वाड्याच्या काही भागाची दुरुस्तीही करण्यात आली. मुख्य दरवाजा आणि बाहेरील बांधकाम जुन्या पद्धतीचे आहे. पालखी मुक्कामाच्या दिवशी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. येथे महाराजांच्या पादुकांचे पूजन शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते केले जाते.