भाजे धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी;पुण्यासह मुंबईतून पर्यटक दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:35 IST2025-06-22T19:35:26+5:302025-06-22T19:35:42+5:30

भाजे येथील प्रसिद्ध धबधब्याने पर्यटकांना आकर्षित केले आहे. पाऊस सुरू होताच लोहगड, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या भाजे धबधब्यावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

Tourists flock to soak in the waterfall | भाजे धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी;पुण्यासह मुंबईतून पर्यटक दाखल

भाजे धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी;पुण्यासह मुंबईतून पर्यटक दाखल

लोणावळा : मागील काही दिवसांपासून लोणावळा परिसरात पाऊस सुरू असल्याने अनेक धबधबे सक्रिय झाले आहेत. भाजे येथील प्रसिद्ध धबधब्याने पर्यटकांना आकर्षित केले आहे. पाऊस सुरू होताच लोहगड, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या भाजे धबधब्यावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

शनिवारी, रविवार तर धबधबा गर्दीने फुलला होता. भाजे लेणी परिसरात असलेल्या या धबधब्यावर भुशी धरणाप्रमाणे पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांना मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटता येतो. पुण्यासह मुंबईतील पर्यटकही धबधब्यावर गर्दी करत आहेत. लोहगड, विसापूर किल्ल्यावर आल्यानंतर वाट वाकडी करून पर्यटक येथे आवर्जून थांबत आहेत. लोणावळ्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटकही येथे येऊन भिजण्याचा आनंद लुटत आहेत. यात तरुणाईची संख्या अधिक आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून व भाजे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने या ठिकाणी ‘मिनी भुशी’ धरणाची प्रतिकृती उभारण्यात आली असून, स्थानिकांना रोजगार व व्यवसाय उपलब्ध झाला आहे. तयार केलेल्या या कृत्रिम पायऱ्यांवर आलेले पर्यटक भिजण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत.

बेशिस्त पार्किंगमुळे कोंडी

शनिवार, रविवार असल्याने पर्यटक संख्या अधिक होती. त्यामुळे या भागातील अरुंद रस्ते, रेल्वे गेट परिसरात वाहनांची कोंडी झाली होती. त्यात बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे नागरिकांना विनाकारण कोंडीत अडकावे लागले.

Web Title: Tourists flock to soak in the waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.