पवनाधरणामध्ये एक पर्यटक बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 20:03 IST2018-04-23T17:17:00+5:302018-04-23T20:03:00+5:30
आंबेगाव परिसरात मित्रांसोबत फिरायला आलेल्या डि.वाय.पाटील कॉलेजचा विद्यार्थी शुभम बारिकराव बसेकर पोहण्यासाठी धरणात गेला असता बुडाला आहे.

पवनाधरणामध्ये एक पर्यटक बुडाला
ठळक मुद्देडी.वाय.पाटील कौलेजमध्ये शिक्षण घेत होता.
मावळ: पवना धरणाच्या बॅक वॉटरला आंबेगाव परिसरात मित्रांसह फिरायला आलेला एक २१ वर्षीय युवक इतर मित्रांसह पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. शुभम बारीकराव वसेकर (रा.चऱ्होली,ता.हवेली) असे या युवकाचे नाव आहे. तो आपल्या ५ ते ६ शालेय मित्रांसोबत गेट टुगेदर साजरे करण्यासाठी आला होता. ही घटना सोमवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तो डी.वाय.पाटील कौलेजमध्ये शिक्षण घेत होता. याबाबत अजय कृष्णा खांडेकर (वय २१, रा. दिघी, पुणे) याने फिर्याद दिली.याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.