शांती करण्यासाठी माहेरून तीन लाख आणण्याकरीता महिलेचा छळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 15:45 IST2019-03-08T15:43:12+5:302019-03-08T15:45:10+5:30

एका विवाहित महिलेला मंगळ गुरु असल्याने त्याची शांती करण्याकरिता माहेरुन तीन लाख रुपये घेवून येण्याची धमकी देत धार्मिक विधीच्या नावाखाली तिचा मानसिक व शाररीक छळ करण्यात आला. कात्रज कोंढवा रस्त्यावरील शिवशंभो नगर येथे ही घटना घडली.  u

torturing woman for three lakh rupees | शांती करण्यासाठी माहेरून तीन लाख आणण्याकरीता महिलेचा छळ 

शांती करण्यासाठी माहेरून तीन लाख आणण्याकरीता महिलेचा छळ 

पुणे :  एका विवाहित महिलेला मंगळ गुरु असल्याने त्याची शांती करण्याकरिता माहेरुन तीन लाख रुपये घेवून येण्याची धमकी देत धार्मिक विधीच्या नावाखाली तिचा मानसिक व शाररीक छळ करण्यात आला. कात्रज कोंढवा रस्त्यावरील शिवशंभो नगर येथे ही घटना घडली.  

          या प्रकरणी एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. या संदर्भात महिलेचा नवरा, सासू, सासरा यांच्या विरोधात जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमताने फिर्यादी यांना तुला मंगळ गुरु असल्याने तुझी शांती करायची आहे असे सांगून या विधीकरिता माहेरुन 3 लाख रुपये  घेऊन ये, पैसे आणले नाही तर तुला सोडचिठ्ठी देऊ. अशी धमकी देत फिर्यादीच्या वडिलांकडून 1 लाख रुपये घेतले. दरम्यान फिर्यादीच्या सासुने वेगवेगळ्या प्रकारे अघोरी कृत्यातून फिर्यादीच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. यावर तोडगा काढण्याकरिता फिर्यादीला न-हे येथील एका भोंदु बाबाकडे अमावस्या पौर्णिमेच्या वेळी नेण्यात आले. फिर्यादीने त्यास विरोध केला असता त्यांना मारहाण करुन माहेरुन 2 लाख रुपये आणण्याची धमकी देवून घराबाहेर काढण्यात आले. अशाप्रकारे फिर्यादीचा शाररीक व मानसिक छळ करण्यात आला. 

Web Title: torturing woman for three lakh rupees