शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Weather Update : राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस; सर्वदूर पावसासाठी 'वेट अँड वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 7:53 PM

पुढील चार दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस  पडण्याची शक्यता.

पुणे : राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मॉन्सूनच्या वाटचालीस अनुकूल परिस्थिती नसल्याने पुढील ६ ते ७ दिवस मॉन्सूनची आगेकुच होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. राज्यात पुढील चार दिवसात कोणताही अलर्ट देण्यात आला नसून सर्वदूर पावसासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

गेल्या २४ तासात संगमेश्वर, देवरुख १००, जव्हार ९०, वसई ८०, हर्णे, विक्रमगड ५०, दाभोलीम, पालघर ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रातील ओझरखेडा ८०, दहीगाव ७०, जामनेर, निफाड, साक्री ६०, अकोले, नेवासा ५०, बोडावद, पाचोरा, पारोळा, संगमनेर, सटाणा, बागलाण ४० मिमी पाऊस पडला. याशिवाय काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.

मराठवाड्यातील सोयेगाव १००, गंगापूर, लोहा, वाशी ५०, औसा, भोकरदन, पालम ३०, बदनापूर, लातूर, मंथा, पूर्णा, शिरुर अनंतपाल २० मिमी पाऊस पडला. विदर्भातील सिंधखेड राजा ५०, चिखली, मोताळा, वर्धा ४०, चांदूर, देऊळगाव राजा, देवळी, कोरपना, मलकापूर, मेहकर, नागपूर, सेलू ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. घाटमाथ्यावर काही ठिकाणी पाऊस झाला.

मंगळवारी दिवसभर महाबळेश्वर, नागपूर येथे हलका पाऊस झाला. पुढील चार दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस  पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानMonsoon Specialमानसून स्पेशल