शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

लंघेवाडी-चव्हाणवाडी करवसुलीत पुणे जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

ग्रामपंचायतीला ग्रामस्थांकडून पाणीपट्टी, घरपट्टीच्या रूपाने महसूल जमा होतो. या रकमेवर गावचा खर्च, तसेच विकासकामांना चालना मिळत असते. कर जमा ...

ग्रामपंचायतीला ग्रामस्थांकडून पाणीपट्टी, घरपट्टीच्या रूपाने महसूल जमा होतो. या रकमेवर गावचा खर्च, तसेच विकासकामांना चालना मिळत असते. कर जमा करताना ग्रामपंचायतला विविध उपाययोजना कराव्या लागतात.बऱ्याचदा असे कर भरण्यास नागरिकांमध्ये उदासीनता असते. मात्र, लंघेवाडी -चव्हाणवाडी ( ता. शिरूर ) ही छोटीशी ग्रामपंचायत याला अपवाद ठरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून १०० % करवसुली करत या ग्रामपंचायतने पुणे जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. यावर्षी कोरोना सारखे जागतिक महामारीचे संकट आणि लॉकडाऊन असतानाही ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने तब्बल ३,३९,७५० रुपये एवढी रक्कम भरून १०० % कर जमा केला आहे. या छोट्या ग्रामपंचायतचा आदर्श पॅटर्न संपूर्ण राज्यात दिशादर्शक ठरू शकते. या उपक्रमासाठी गावचे आदर्श संतोषराव लंघे, उपसरपंच स्वातीताई हराळे, ग्रामसेविका एस. व्ही. पोळ, ग्रामपंचायत सदस्य जयश्रीताई लोखंडे, प्रभावती गरुड, शोभाताई मोहिते, वैभव जगदाळे, अक्षय बांदल, महेंद्र जासुद, कर्मचारी कर्मचारी, आजी -माजी पदाधिकारी, महिला बचत गट, युवक, युवती प्रयत्न करत आहेत. या १०० % करवसुलीबाबत शिरूरचे गटविकास अधिकारी नलावडे, विस्तार अधिकारी शिंदे यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.

" प्रत्येक ग्रामस्थास ग्रामपंचायत आपली वाटत आहे. गावचा विकास प्रत्येकाच्या सहभागातून शक्य आहे ही भावना सर्वांची आहे. त्यामुळे प्रत्येक जण स्वयंप्रेरणेने विविध कर भरून ग्रामविकासात आपले योगदान देत आहे. हा पॅटर्न संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरू शकतो. " -संतोषराव लंघे. सरपंच

सरपंच संतोषराव लंघे यांचा फोटो