शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर : दर ६० रुपये किलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 11:20 IST

आठ दिवसांपूर्वी २५-३० रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता तब्बल ६० रुपये किलो पर्यंत जाऊन पोहचला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे

ठळक मुद्दे आधी दुष्काळ आणि आता पावसाचा परिणाम  मार्केट यार्डातील तरकरी विभागात सरासरी केवळ तीन ते साडेतीन हजार क्रेटस आवक

पुणे : संपूर्ण राज्यात एप्रिल-मे महिन्यांत पडलेला कडक दुष्काळ आणि त्यानंतर काही ठराविक भागांमध्ये झालेली अतिवृष्टीचा मोठा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये येणारी टोमॅटोची आवक तब्बल निम्याने कमी झाली असून, मागणी कायम असल्याने दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वी २५-३० रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता तब्बल ६० रुपये किलो पर्यंत जाऊन पोहचला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील एक-दीड महिना अशीच परिस्थिती राहिली असे भाजीपाला व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. एप्रिल-मे महिन्यात पडलेल्या कडक दुष्काळामुळे पावसापूर्व होणाऱ्यांच्या टोमॅटोची लागवड झाली नाही. त्यानंतर जून महिन्यात देखील पावसाने ओढ दिली याचा नवीन लागवडीवर मोठा परिणाम झाला. तर पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी थेंब-थेंब पाणी घालून जगवलेला टोमॅटोची बाग जुलै महिन्याच्या सुरुवातील झालेल्या धुवांधार पावसाचा देखील मोठा फटका बसला. त्यात कीड आणि बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवाती पासूनच ढगाळ वातावरण व अधून-मधून येणारा पाऊस याचा टोमॅटो पिकावर चांगलाच परिणाम झाला. टोमॅटोच्या लालकोळी, फळावर काळे ठिपके, चिरटा या कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे झाडांची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडली असून टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून पुण्याच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील तरकरी विभागात सरासरी केवळ तीन ते साडेतीन हजार क्रेटस आवक होत आहे. हीच आवक नेहमी सरासरी आठ हजार क्रेटस्पर्यंत होती. त्यातही येणाऱ्या माल पावसामुळे खराब व किडका असल्याने सध्या केवळ २५ ते ३५ टक्केच आवक होत आहे. परंतु मागणी कायम असल्याने दरामध्ये प्रचंड वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.--पावसाचा मोठा फटकादुष्काळामुळे एप्रिल-मे महिन्यात कमी प्रमाणात टोमॅटोची लागवड झाली. शेतकऱ्यांनी वाढविलेल्या व हाताशी आलेला टोमॅटोच्या बागांना अति पावसामुळे मोठा फटका बसला आहे. यामुळे जून महिन्यात एक एकरमध्ये ९० ते १०० क्रेटस माल निघत असताना आता केवळ १५ ते २० केर्टस्पर्यंत खाली आले आहे. यामध्ये निघालेल्या मालाचा दर्जा देखील कमी आहे.शेतकऱ्यांच्या शेतातच माल नसल्याने दर वाढले आहेत. नवनाथ शेळके, टोमॅटो शेतकरी, धनगरवाडी, जुन्नर .....................

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसdroughtदुष्काळMarket Yardमार्केट यार्ड