शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्याचा विरोध मावळला

By admin | Updated: February 18, 2017 02:58 IST

पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाक्यावर टोल सुरू करण्यास बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. अगोदर

पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाक्यावर टोल सुरू करण्यास बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. अगोदर सर्व समस्या सोडवा आणि मगच टोल सुरू करा,अशी ठोस भूमिका घेतल्याने हा टोलनाका सुरू होईल, की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तत्काळ कामे मार्गी लावल्यामुळे या टोलनाक्यावर गुरुवारी (दि. १६) मध्यरात्री बारा वाजल्यापासून टोल आकारणी करण्यास सुरुवात केली असून, स्थानिक नागरिकांना या टोलमधून सवलत देण्यात आली आहे.पुणे-नाशिक महामार्गाचे राजगुरुनगर ते सिन्नर या दरम्यान रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या एकून १३८ किलोमीटर पैकी फक्त १०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. कामाच्या ७५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर टोलनाका सुरू करण्याचा नियम असल्यामुळे या कामास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला होता; त्यामुळे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा आणि जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथील टोलनाका शनिवार (दि.११) पासून सुरू करण्यात येणार होता. परंतु, येथील बाधित शेतकऱ्यांचे आणि आळे येथील ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे उपविभागीय अधिकारी व आयएलएफएसचे अधिकारी यांनी शेतकरी व आळे ग्रामस्थांबरोबर आळेफाटा येथील सावतामाळी मंदिरात बैठक घेतली. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. आळे येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात यावे, पिंपळवंडी येथील स्मशानभूमीची कामे करा आणि मगच टोल आकारणी करण्यास सुरुवात करा, अशी ठोस आणि आक्रमक भूमिका घेतल्यामुळे टोल आकारणी बंद करण्यात आली होती. येथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दणका दिल्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने आळे येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम पिंपळवंडी येथील स्मशानभूमीचे व पिंपळवंडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास सुरुवात केल्यामुळे हा टोलनाका सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.