शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

पारुंडेत आज ध्वजारोहण सोहळा

By admin | Updated: September 23, 2015 03:34 IST

दर बारा वर्षांनी श्रीक्षेत्र पारुंडे (ता. जुन्नर) येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या बुधवारी (दि. २३) दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लेण्याद्री : दर बारा वर्षांनी श्रीक्षेत्र पारुंडे (ता. जुन्नर) येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या बुधवारी (दि. २३) दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल़ साधू-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या ध्वजारोहण सोहळ्याने या कुंभमेळ्याचा आरंभ होत आहे, अशी माहिती आमदार शरद सोनावणे यांनी जुन्नर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नाशिक येथून आलेल्या नाथपंथीय साधूंचे जुन्नर तालुक्यात भक्तिभावपूर्ण वातावरणात आगमन झाले आहे. त्यांचे आळेफाटा, पिंपळवंडी ग्रामस्थांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिरातील कालिकामातेचे महाद्वार या औचित्याने १२ वर्षांनी उघडणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ध्वजारोहण समारंभाने कुंभमहापर्वाला आरंभ होत आहे. या समारंभास योगी निर्मलनाथ, योगी कृष्णनाथ, योगी सोमवारनाथ, योगी सुमरनाथ, महंतयोगी सूरजनाथजी, पीरयोगी गंगानाथजी यांच्यासह बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)