शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांच्या छळाला कंटाळून तरुण व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल; ५० लाख मुद्दल देऊनही ६० लाख व्याज वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:51 IST

आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत ३ गुंठे जमीन साठेखत व कायमस्वरूपी कुलमुखत्यारपत्राद्वारे नातेवाईकाच्या नावावर करून घेतली

उरुळी कांचन :उरुळी कांचन परिसरात बेकायदेशीर सावकारी, मारहाण, अपहरण व बंदुकीचा धाक दाखवून जमीन नावावर करून घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महादेव विठ्ठल जरांडे (वय ३६, व्यवसाय – जुने चारचाकी वाहन खरेदी-विक्री) यांनी दिलेल्या जबाबानुसार, आरोपी आनंता पवार व माऊली पवार यांनी व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या रकमा दिल्या. मात्र, त्यावर दरमहा ८ ते १० टक्के इतक्या अवाजवी व्याजदराने वसुली करण्यात आली.तक्रारदाराकडून एकूण ५३ लाख ८९ हजार रुपये मुद्दल घेतल्यानंतरही आरोपींनी ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६० लाख ४१ हजार रुपये व्याज वसूल केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय, व्याज न दिल्यास दबाव टाकत विक्रीसाठी ठेवलेल्या १२ जुन्या चारचाकी गाड्या ओढून नेण्यात आल्या. डिसेंबर २०२५ मध्ये आरोपींनी तक्रारदारास मारहाण करून जबरदस्तीने कुंजीरवाडी येथे नेले. तेथे बंदुकीचा धाक दाखवत, कोरेगाव मूळ येथील ३ गुंठे जमीन साठेखत व कायमस्वरूपी कुलमुखत्यारपत्राद्वारे आरोपींच्या नातेवाईकाच्या नावावर करून घेण्यात आली. संबंधित व्यवहारात कोणताही धनादेश प्रत्यक्षात देण्यात आलेला नसल्याचा आरोप आहे.

सततच्या मानसिक, आर्थिक व शारीरिक छळामुळे तक्रारदाराने २६ जानेवारी २०२६ रोजी विषारी औषध प्राशन केल्याचा गंभीर प्रकारही उघडकीस आला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, शुद्धीत असताना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी आनंता पवार, माऊली पवार, दिपाली साळुंखे व विजय पांडुरंग गोते यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.

 याप्रकरणी २९/१२/२०२५ रोजी व्यावसायिकाने उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड बापूराव दडस यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. त्याच अनुषंगाने उरुळी कांचन पोलिसांकडे तो अर्ज चौकशीसाठी आला होता. लवकरात लवकर कारवाई झाली असती तर माझ्या पतीने विष प्राशन केले नसते अशी प्रतिक्रिया तक्रारदाराच्या पत्नीने व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Frustrated by lenders, businessman attempts suicide after exorbitant interest.

Web Summary : Uruli Kanchan businessman attempted suicide due to illegal lending harassment. Despite paying ₹50L principal, ₹60L interest was extorted. He was beaten, threatened, and forced to transfer land. Police filed charges against four individuals.
टॅग्स :Puneपुणेuruli kanchanउरुळी कांचनPoliceपोलिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा