सावत्र वडीलांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

By नितीश गोवंडे | Updated: December 18, 2024 17:18 IST2024-12-18T17:17:39+5:302024-12-18T17:18:22+5:30

तरुण काही काम करत नसल्याने त्याचे वडिलांशी काही पटत नव्हते, त्यांचे वारंवार वाद होत असे

Tired of being harassed by his stepfather the young man took an extreme step. | सावत्र वडीलांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

सावत्र वडीलांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

पुणे: सावत्र वडीलांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढवा भागात घडली. मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वडीलांविरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

शब्बीर उर्फ संदीप कसोटे (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विजय सुमतराव कसोटे (रा. लक्ष्मीनगर, काेंढवा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदीपची मावशी संगीता राजू बागवे (वय ५१, रा. लोहियानगर, गंज पेठ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपच्या आईने आरोपी विजय कसोटे यांच्याशी दुसरा विवाह केला होता. कसोटे रिक्षाचालक आहे. संदीप काही काम करत नव्हता. तो अविवाहित होता. वडीलांशी त्याचे पटत नसल्याने कायम वाद व्हायचे. वडीलांनी त्याला त्रास दिल्याने त्याने ३ ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांच्या त्रासामुळे संदीपने आत्महत्या केल्याचे त्याची मावशी संगीता बागवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास बाबर करत आहेत.

Web Title: Tired of being harassed by his stepfather the young man took an extreme step.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.