शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

बारामतीतील कार्यक्रमाचं ऐनवेळी निमंत्रण; सुप्रिया सुळेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:02 IST

लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, असे सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटले आहे.

बारामती :बारामती तालुक्यातील अंजनगाव (कऱ्हावागज) येथे कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास ऐनवेळी निमंत्रण देण्यावरून खासदार सुप्रिया सुळे या नाराज झाल्या आहेत. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे आपली ही नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.शनिवारी(दि ११) अंजनगाव येथील महावितरणच्या ३३..११ केव्ही उपकेंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियोजित उदघाटन कार्यक्रमास सुळे यांना एेन वेळी निमंत्रण देण्यात आले.यावर सुळे यांनी नाराजी व्यक्त करीत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले. लोकसभा मतदार संघाचे आपण लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे किमान २४ तास आधी निमंत्रण मिळाले, तर त्या अनुषंगाने दौऱ्याचे नियोजन करता येते त्यामुळे संबंधीत यंत्रणांनी योग्य तो प्रोटोकॉल पाळावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

विशेष म्हणजे आजच खासदार सुळे यांचा बारामती तालुका दौरा सुरू आहे. अंजनगाव येथील कार्यक्रमाबाबत त्यांना आधीच कल्पना असती, तर त्यानुसार त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करता आले असते, हेही त्यांनी आपल्या पत्रातून लक्षात आणून दिले असून हेच पत्र त्यांनी जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना पण पाठवले आहे.अंजनगाव येथील कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आपल्याला थोड्या वेळापूर्वी मिळाली. या भागाचे आपण लोकप्रतिनिधी असून आपण स्वतः या भागाचे लोकप्रतिनिधी असून येथील जनतेचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आपले दौरे तथा कार्यक्रम पुर्वनियोजित असतात. तरीही महत्वपूर्ण सार्वजनिक कार्यक्रमाचे नियोजन किमान २४ तासांपुर्वी जरी केले आणि मला तशी कल्पना दिली तर आपल्या कार्यक्रमात तसा बदल करता येणे शक्य आहे. संबंधित यंत्रणांनी याची कृपया नोंद घ्यावी. लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणBaramatiबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस