शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण येथे वाघाची कातडी जप्त

By admin | Updated: May 9, 2017 03:34 IST

पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील सकुंडेवस्तीजवळ असणाऱ्या पुलाखाली तब्बल तीन वाघांच्या कातडे असलेल्या तीन पिशव्या पोलिसांनी जप्त केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कभिगवण : पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील सकुंडेवस्तीजवळ असणाऱ्या पुलाखाली तब्बल तीन वाघांच्या कातडे असलेल्या तीन पिशव्या पोलिसांनी जप्त केल्या. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलकंठ राठोड यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार : सकाळी ९च्या सुमारास भिगवण चौकात पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना, पोलिसांना सकुंडेवस्तीशेजारी असणाऱ्या पुलाखाली संशयास्पद पिशव्या असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस हवालदार अनिल सातपुते यांनी तातडीने ही माहिती अधिकारी राठोड यांना कळवित घटनास्थळी जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना तीन वेगवेगळ्या पिशवीत तीन वाघांच्या कातड्या आढळून आल्या. ही कातडी पोलिसांनी ताब्यात घेऊन याबाबतीत वनविभागाचे अधिकारी यांना बोलावणे पाठवले. ही कातडी परराज्यांतून आणली जात असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात काळसर रंगाचा पट्टेरी वाघ आढळत नाही आणि सापडलेल्या कातडीमध्ये एक काळसर पट्टेरी वाघाचे कातडे आहे. तीन कातड्या एकत्र सापडल्याने एकच खळबळ उडाली असून, यासंख्येवरून वन्यप्राण्यांच्या शिकार करून त्यांच्या तस्करीचे मोठे जाळे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस अधिकारी राठोड यांनी नाकाबंदीमुळे या प्रकारातील आरोपी घाबरून कातडी टाकून गेला असल्याची शक्यता व्यक्त केली. लोकवस्तीत अशा प्रकारे कातडी टाकून आरोपी पळाल्याने पोलीस आणि वनविभागाच्या समोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे चित्र आहे, पुढील तपास करुन आरोपी सापडणार का, हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतीत वनविभागाचे वनपाल अशोक नरुटे तसेच वन रक्षक योगीता नायकवडी यांनी सापडलेली कातडी वाघ सदृश प्राण्यांची असल्याचे सांगून ही कातडी ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविले आहेत.