पुण्याच्या मध्यवर्ती भागात खुनाचा थरार; चाकूने भोसकून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:16 IST2022-07-26T14:16:18+5:302022-07-26T14:16:40+5:30

हल्लेखोर पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत

Thrill of murder in central Pune A young man was stabbed to death | पुण्याच्या मध्यवर्ती भागात खुनाचा थरार; चाकूने भोसकून तरुणाचा खून

पुण्याच्या मध्यवर्ती भागात खुनाचा थरार; चाकूने भोसकून तरुणाचा खून

पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा मध्यरात्री चाकूने भोसकून आणि डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. नाना पेठेतील नवा वाडा येथे साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली.

याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय लक्ष्मण व्हलाळ (वय 28) असे खून झालेल्याचे नाव आहे. हल्लेखोर पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान खुनाचा थरार घडल्याने खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Read in English

Web Title: Thrill of murder in central Pune A young man was stabbed to death