नात्याला काळीमा फासणारी घटना! भोसरीत तीन वर्षीय बहिणीवर भावाने केले लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 13:34 IST2021-12-03T13:30:33+5:302021-12-03T13:34:56+5:30

पिंपरी: बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भोसरी येथे घडली आहे. भावाने आपल्या तीन वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ...

Three-year-old sister sexually abused by brother | नात्याला काळीमा फासणारी घटना! भोसरीत तीन वर्षीय बहिणीवर भावाने केले लैंगिक अत्याचार

नात्याला काळीमा फासणारी घटना! भोसरीत तीन वर्षीय बहिणीवर भावाने केले लैंगिक अत्याचार

पिंपरी: बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भोसरी येथे घडली आहे. भावाने आपल्या तीन वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला आहे. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने गुरूवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विधीसंघर्षीत बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचे आई वडील ऑगस्ट महिन्यात ( नक्की तारीख माहिती नाही )कामानिमित्त गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. मात्र या बाबत मुलीच्या आई वडीलांना माहिती नव्हती. गुरूवारी मुलीला त्रास झाल्याने तीला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तपासणी केली असता तीच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीला विचारले असता, तीने हा प्रकार झाल्याचे सांगितले. आरोपीवर शारीरीक लैंगिक अत्याचार केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: Three-year-old sister sexually abused by brother