ट्रकचालकाची लूटमार करणाऱ्या तिघांना अटक

By Admin | Updated: May 13, 2015 02:51 IST2015-05-13T02:51:32+5:302015-05-13T02:51:32+5:30

रात्रीच्या वेळी वाहनचालकाला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून लूटमार करण्यात आली. जिरेगाव (ता. दौंड) येथून जवळच असणाऱ्या दौंड-बारामती

Three robbers arrested by trucker | ट्रकचालकाची लूटमार करणाऱ्या तिघांना अटक

ट्रकचालकाची लूटमार करणाऱ्या तिघांना अटक

कुरकुंभ : रात्रीच्या वेळी वाहनचालकाला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून लूटमार करण्यात आली. जिरेगाव (ता. दौंड) येथून जवळच असणाऱ्या दौंड-बारामती रोडवरील गुंजखिळे येथे हा प्रकार घडला. मात्र, ग्रामस्थ व पोलिसांच्या सतर्कतेमुळे ३ जणांना पकडण्यात यश आले.
ट्रक (जीजे १ एटी ७१००) हा बारामती एमआयडीसीतील कंपनीतून गोळीपेंड भरून चालला होता. गुंजखिळे येथे तिघांनी शस्त्राचा साह्याने धाक दाखवून हा ट्रक थांबविला. चालक सचिन मोतीलाल शीलवंत (रा. नाशिक) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या जवळ असणारी रोख रक्कम काढून घेतली. हा प्रकार ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.
ग्रस्त घालत असलेले पोलीस हवालदार पंडित मांजरे यांनी घटनास्थळावर येऊन चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यात अक्षय पोपट जेडगे, सलीम खाजा शेख, समीर हनुमंत भांडवलकर (तिघे रा. नीरावागज, ता. बारामती) यांचा समावेश आहे. त्यांच्याजवळील एक विनानंबरची प्लसर दुचाकी जप्त केली व त्यांना पकडून चौकशी केली असता, लूटमार केल्याची कबुली त्यांनी दिली.
ग्रामस्थ व जिरेगावचे माजी सरपंच हरिदास लागळे, अभिजित शितोळे यांनी पोलिसांना या वेळी मदत केली. (वार्ताहर)

Web Title: Three robbers arrested by trucker