शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

'61 दिवस' सुरक्षित राहणाऱ्या पुण्यातील जनता वसाहतीत कोरोनाचा शिरकाव,तीन नागरिकांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 6:24 PM

'नो कोरोना पॅटर्न'ला काही प्रमाणात तडा गेला असला तरी नियंत्रित करण्याकरिता प्रयत्न सुरु

ठळक मुद्देसुदैवाने क्लोज कॉन्टॅक्ट मधील सर्व निगेटिव्ह शहरातील जनता वसाहत ही सर्वात मोठी झोपडपट्टी

पुणे : पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या दिवसापासून (9 मार्च ते 14 मे) या तब्बल 61 दिवसांमध्ये कोरोनापासून सुरक्षित राहिलेल्या 'जनता वसाहत' झोपडपट्टीतील तीन रहिवासी बाधित झाले आहेत. वास्तविक यातील दोन रुग्ण हे अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुदैवाने या तीनही रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील (क्लोज कॉन्टॅक्ट) सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जनता वसाहतीच्या 'नो कोरोना पॅटर्न'ला काही प्रमाणात तडा गेला असला तरी त्याला नियंत्रित करण्याकरिता प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. शहरातील जनता वसाहत ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.

तब्बल 100 एकरांचा परिसर या वसाहतीने व्यापलेला आहे. गरीब-कष्टकरी जनतेची वसाहत असलेल्या या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव होऊ नये याकरिता स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या. महापालिका, पोलीस आणि स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी मिळून आतापर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने राबविल्या. वसाहतीमध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून कालव्यावरुन जाणारे पाणी पुरवठ्याच्या वाहिन्यांवरही पत्रे लावण्यात आले आहेत.नागरिकांसाठी अल्पदरात भाजीची व्यवस्था करण्यात आली असून पालिकेच्या दवाखान्यात स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ अनेकजण घेत आहेत. वस्तीमध्येच रेशन, अन्नधान्य आणि भाजीपाला उपलब्ध झाल्याने नागरिकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले असून केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच सोडले जात आहे.वसाहतीमधील दोघे जण ससून आणि एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील आठवड्याभरापासून हे दोघे दवाखान्यात उपचार घेत आहेत. हे दोघेही कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. या दोघांच्या निकटच्या संपकार्तील सर्वांची तपासणी करण्यात आली. परंतू, सुदैवाने त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे या दोघांना कोरोनाची लागण वसाहतीमध्ये झाली की दवाखान्यात याबाबत रहिवासी शंका उपस्थित करु लागले आहेत. या दोघांसोबत आणखी एक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले असून त्याच्याही निकटच्या संपकार्तील सर्व व्यक्ती निगेटीव्ह आल्या आहेत.  

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस